शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
3
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
5
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
6
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
7
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
8
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
9
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
10
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
11
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
12
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
13
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
14
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
15
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
16
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
17
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
18
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
19
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
20
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

शिवसेनेनं पालघरमध्ये वनगांना डावललं, राजेंद्र गावितांना धनुष्यबाणाची उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 4:59 PM

पालघर लोकसभा निवडणुकीचा सेना-भाजपाचा तिढा जवळपास सुटल्याचे निश्चित मानले जात आहे.

वसई-विरार- पालघर लोकसभा निवडणुकीचा सेना-भाजपाचा तिढा जवळपास सुटल्याचे निश्चित मानले जात आहे. पालघर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं 25-23चा फॉर्म्युला तयार केला आहे. यावेळी भाजपानं पालघरची जागा शिवसेनेला सोडली आहे. चिंतामण वनगा यांचे गेल्या वर्षी जानेवारीत दिल्लीत निधन झाले होते. त्यानंतर त्या जागेसाठी त्यांचे पुत्र इच्छुक होते.परंतु भाजपानं त्यांना डावलून राजेंद्र गावितांना उमेदवारी दिल्यानं श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांनी पोटनिवडणूक लढवली होती. परंतु ते पराभूत झाले. मात्र त्यांनी भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित यांना चांगली टक्कर देत जवळपास अडीच लाख मतं मिळवली. त्यामुळे ही जागा शिवसेनेसाठी यंदा सोडण्यात आली. पण शिवसेनेकडून पालघरमध्ये यंदा पुन्हा भाजपाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित उमेदवारी मिळणार असून, ते शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेत 26-22 असा फॉर्म्युला होता. त्यावेळी भाजपानं स्वत:च्या कोट्यातील दोन जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या होत्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी हातकणंगलेमधून निवडणूक लढवली होती. त्यात ते विजयी झाले होते. तर महादेव जानकर बारामतीमधून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. ते राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंकडून पराभूत झाले होते. मात्र त्यांनी सुळे यांनी कडवी लढत दिली होती. दोन जागा मित्रपक्षांसाठी सोडणाऱ्या भाजपानं 2014 मध्ये 24 जागा लढवल्या. त्यातील 23 जागा त्यांनी जिंकल्या. तर शिवसेनेनं 22 जागा लढवत 18 जागांवर यश मिळवलं होतं.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpalgharपालघरShiv Senaशिवसेना