शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
3
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
4
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
5
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
6
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
7
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
8
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
9
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
10
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
11
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
13
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
14
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
15
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
16
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
17
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
18
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
19
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
20
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."

UP panchayat Election: दोन वेळा खासदार, साधी जिल्हा पंचायत निवडणूक जिंकता आली नाही; 2100 मतांनी पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 2:18 PM

UP Panchayat Election Results 2021, Reena Chaudhary: आता दोन वेळा खासदार असलेली महिला जिल्हा पंचायतला निवडून येणार नाही असे कुठे होईल का? भाजपाने त्यात त्यांना जिल्हा पंचायतचा अध्यक्ष बनविणार असल्याचा डाव खेळला. पण हा खेळ भाजपाच्याच अंगलट आला.

UP Gram Panchayat Election 2021 लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकीत (Uttar Pradesh panchayat Election) अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. लखनऊच्या मोहनलालगंज मतदारसंघातून दोनवेळा खासदार राहिलेल्या भाजपाच्या उमेदवार रीना चौधरी (Ex MP reena chaudhary) यांना साधी जिल्हा पंचायत निवडणूक जिंकता न आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांना समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने पाडले आहे. (two times MP reena chaudhary lost Uttar Pradesh panchayat Election from lucknow  )

UP panchayat Election: अयोध्या, काशी, मथुरा! भाजपाचा दारूण पराभव; पंचायत निवडणुकीत सपा, बसपाने चारली धूळलखनऊच्या जिल्हा पंचायतचे अध्यक्षपद हे एससी महिलेसाठी राखीव होते. यामुळे भाजपाने माजी खासदार असलेल्या रीना चौधरी यांना वॉर्ड नंबर १५ मधून जिल्हा पंचायतीची उमेदवारी दिली. आता दोन वेळा खासदार असलेली महिला जिल्हा पंचायतला निवडून येणार नाही असे कुठे होईल का? भाजपाने त्यात त्यांना जिल्हा पंचायतचा अध्यक्ष बनविणार असल्याचा डाव खेळला. पण हा खेळ भाजपाच्याच अंगलट आला. सपा समर्थित पलक रावतने चौधरी यांना 2100 मतांनी पराभूत केले. 

वॉर्ड नंबर १५ मधून पलक यांना 8834 मते मिळाली. तर रीना चौधरी यांना 6735 मते मिळाली. यामुळे त्यांचे अध्यक्ष होण्याचे स्वप्न भंगले. लखनऊ पंचायतमध्ये 25 जागा आहेत. जिंकणारे सदस्य एका व्यक्तीला जिल्हा पंचायतचा अध्यक्ष निवडतात. रीना चौधरी या मोहनलालगंज लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पार्टीच्या 1998-99 आणि 1999-2004 अशा दोनदा खासदार राहिलेल्या आहेत. 2016 मध्ये त्यांना बसपामध्ये प्रवेश केला होता. परंतू पोटनिवडणुकीत सपा-बसपा आघाडी झाल्याने त्यांनी राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला होता. 

उत्तर प्रदेशच्य़ा या मिनी विधानसभा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या निवडणुकीत पूर्वांचल, अवध आणि मध्ये युपीमध्ये सपाचा दबदबा पहायला मिळाला आहे. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभा क्षेत्र असलेल्या वारणसी आणि अयोध्येमध्ये भाजपाला कडवी हार पत्करावी लागली आहे. तर पश्चिम युपीमध्ये भाजपाला विजयासाठी झगडावे लागले आहे. तिथे जाटबहुल भागात अजीत सिंहांच्या आरएलडीने भाजपावर मात केली आहे. 

पश्चिम बंगालनंतर उत्तर प्रदेशच्या पंचायत निवडणुकांनी भाजपाची (BJP Defeat) झोप उडविली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला मोठा झटका बसला आहे. अयोध्येपासून मथुरेपर्यंत आणि काशीसह राज्यभरात सपाने भाजपाला चितपट केले आहे. महत्वाचे म्हणजे हे तिन्ही जिल्हे योगी आदित्यनाथ सरकारच्या (Yogi Adityanath) अजेंड्यामध्ये नेहमी असतात. या तीन्ही जिल्ह्यांमध्ये गेल्या चार वर्षांपासून योगी सरकारने खूप मेहरबानीदेखील केली आहे. यामुळे या तिन्ही जिल्ह्यांत झालेली पडझड भाजपाला येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मोठे संकेत देत आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूकBJPभाजपाMember of parliamentखासदारSamajwadi Partyसमाजवादी पार्टी