Pandharpur Election Results Live: “पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही.. सांगा आता कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम?”
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 05:14 PM2021-05-02T17:14:44+5:302021-05-02T17:16:09+5:30
पंढरपूर पोटनिवडणूक निकाल २०२१: पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांनी बाजी मारली आहे. अद्याप त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा झाली नाही. तत्पूर्वी भाजपाकडून ठाकरे सरकारच्या नेत्यांवर टीकास्त्र सुरू झालं आहे.
पंढरपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर येथे पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत भाजपाचे समाधान आवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भगिरथ भालके यांच्यात थेट लढत होती. या निवडणुकीत भाजपाचे समाधान आवताडे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारावर बाजी मारत विजयी पताका फडकवला आहे. समाधान आवताडे यांचा ३ हजार ७१६ मतांनी विजय झाला आहे. भाजपा उमेदवाराच्या घराबाहेर जल्लोष सुरू आहे.(BJP MLC Gopichand Padalkar Reaction on Pandharpur by Election Result)
या निवडणुकीच्या निकालावर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाष्य केले आहे. पडळकर म्हणाले की, पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही.. सांगा आता कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम?” नुतन आमदार समाधान आवताडेंचं ३ हजार मतांनी दणदणीत विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. जय मल्हार असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांची पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर बोलण्याची उंची नाही. त्यांना दुसऱ्यांच्या लग्नात नाचण्याची सवय आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही.. सांगा आता कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम?’
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) May 2, 2021
नुतन आमदार समाधान आवताडेंचं सात हजार मतांनी दणदणीत विजय झाल्याबद्दल हार्दीक अभिनंदन.
जय मल्हार.@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis
Prashant Paricharak - प्रशांत परिचारक @SamadhanAutadepic.twitter.com/kWXKR4wFXC
महाविकास आघाडीच्या आमदारांना भाजपा एकच पर्याय
पंढरपुर पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यापर्यंत सगळे गल्ली गल्ली फिरले तरीही लोकानी नाकारले. हा महाविकास आघाडीच्या आमदारांना संदेश आहे. येणारा धोका समजा आणि एक पाऊल पुढे टाका. भाजपा हा एकच पर्याय आहे. महाराष्ट्राची जनता आमच्या बरोबर आहे असं सांगत भाजपा आमदार नितेश राणेंनी सत्ताधारी आमदारांना खुली ऑफर दिली आहे.
चंदक्रांत पाटलांनीही साधला निशाणा
मंगळवेढा-पंढरपूरमध्ये भाजपाचा स्पष्ट विजय झाला आहे. वीज कनेक्शन कापणे, कोविड काळात अनेकांना पॅकेज नाही. पीकविमा नाही, त्यामुळे लोक निवडणुकीची वाट पाहत होते. राज्यातील जनतेच्या मनात महाविकास आघाडी सरकारविरोधात राग आहे. याची दखल राज्य सरकारला घ्यावी लागेल असं त्यांनी सांगितलं त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं नाव न घेता चंद्रकांत पाटलांनी टोला लगावला. पंढरपूरात करेक्ट कार्यक्रम झाला. दुसऱ्याचे शब्द वापरणं मला आवडत नाही. पंढरपूरमध्ये कार्यकर्ते नीट कामाला लागले तर काय होऊ शकतं हे दिसून आलं. तसेच प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे यांची घट्ट एकी झाल्याने हा निकाल लागला असल्याचं श्रेय चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्ते आणि परिचारक आवताडे यांच्या एकीला दिलं.