शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
3
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
4
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
5
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
6
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
7
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
8
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
9
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
10
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
11
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
12
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
13
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
14
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."
15
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
16
कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC
17
सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अ‍ॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
18
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
19
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
20
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

"राज्यात सत्ताबदल होणार हे निश्चित आणि तो कसा होणार ते अजित पवारांना माहित्येय"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 1:21 PM

bjp leader chandrakant patil hits out at ncp leader ajit pawar: भाजपवर टीका करणाऱ्या अजित पवारांचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून समाचार

सोलापूर: राष्ट्रवादीचे आमदार भारत भालकेंच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट संघर्ष पाहायला मिळत आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीनं भारत भालकेंचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रवादीनं जोर लावला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीत जातीनं लक्ष घातलं आहे. (bjp leader chandrakant patil hits out at ncp leader ajit pawar)मला चंपा बोलणं थांबवा, अन्यथा...; चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांना थेट इशाराभगीरथ भालकेंच्या प्रचारासाठी आलेले अजित पवार अनेकदा भाजपला लक्ष्य करत आहेत. महाविकास आघाडीचं सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे. हे सरकार पाडणं येऱ्यागबाळ्याचं काम नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर हल्ला चढवत आहेत. अजित पवारांकडून होत असलेल्या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना पंढरपूर-मंगळवेढ्यात येऊन गल्लोगल्लीत फिरावं लागत आहे. फारशा महत्त्वाच्या नसलेल्या लोकांच्या भेटीगाठी घ्याव्या लागत आहेत. हा अजित पवारांचा स्वभाव नाही, असा खोचक टोला पाटील यांनी लगावला.“महाविकास आघाडीचं सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय; हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही”सरकार पडणार नाही असं अजित पवारांना सारखं का सांगावं लागतं, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. सरकार पडणार नसल्याचा विश्वास असेल तर मग इतकं आकांडतांडव कशासाठी करता? आम्ही काही सत्ताबदलाची आस लावून बसलेलो नाही. पण राज्यात सत्ताबदल कसा होणार हे अजित पवारांना माहीत आहे. ते सध्या खोटा आव आणत आहेत, अशा शब्दांत पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला. मला चंपा म्हणणं बंद करा. अन्यथा मग मीदेखील पार्थ पवार आणि इतरांचे शॉर्टफॉर्म सांगेन, असा इशारा त्यांनी दिला.रोहित पवार म्हणाले, "राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण..."'अजित पवारांना काय झालंय माहीत नाही. ते अलीकडे जरा जास्तच जोरात आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मी पीएचडी करणार असल्याचं म्हटलं होतं आता मी अजित पवारांवर एम. फिल. करणार आहे. कारण इतकं सगळं करूनही ते छातीठोकपणे बोलत आहेत. त्यांची सिंचन प्रकरणी चौकशी सुरू आहे. बँक घोटाळा प्रकरणात त्यांचं नाव आहे. राज्यातले अनेक साखर कारखाने अडचणीत येतात आणि अजित पवार ते खरेदी करतात. अजित पवारांचे नेमके किती साखर कारखाने आहेत, हे त्यांनी एकदा सांगावं,' असं पाटील म्हणाले.मुख्यमंत्री ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र; मोदींकडे केल्या दोन महत्त्वाच्या मागण्या'सत्तेत असलेल्या व्यक्तीनं नम्र राहावं. पण अजित पवार नाक वरून चालत आहेत. सरकार कोणाचंही असलं तरी हेच उपमुख्यमंत्री होतात आणि इतकं सगळं करूनही ते अशी विधानं करतात. या सगळ्यासाठी हिंदीत 'सौ चुहे खाके बिल्ली चली हज' अशी एक म्हण आहे. कालचक्र सतत फिरत असतं. त्यामुळे अजित पवारांनी फार गमजा मारू नयेत. त्यांनी नीट बोलावं,' असा इशारा पाटील यांनी दिला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारchandrakant patilचंद्रकांत पाटीलBharat Bhalkeभारत भालकेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाparth pawarपार्थ पवार