शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
2
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
4
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
5
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
6
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
7
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
8
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
9
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
10
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
11
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
12
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
13
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
14
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
15
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
17
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
18
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
19
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
20
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या

मला चंपा बोलणं थांबवा, अन्यथा...; चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांना थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 12:59 PM

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक: भाजप प्रदेशाध्यक्षांकडून उपमुख्यमंत्री लक्ष्य

सोलापूर: राष्ट्रवादीचे आमदार भारत भालकेंच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट संघर्ष पाहायला मिळत आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीनं भारत भालकेंचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रवादीनं जोर लावला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीत जातीनं लक्ष घातलं आहे. “महाविकास आघाडीचं सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय; हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही”भगीरथ भालकेंच्या प्रचारासाठी आलेले अजित पवार अनेकदा भाजपला लक्ष्य करत आहेत. महाविकास आघाडीचं सरकार मजबूत आहे. हे सरकार पाडणं येऱ्यागबाळ्याचं काम नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर हल्ला चढवत आहेत. अजित पवारांकडून होत असलेल्या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना पंढरपूर-मंगळवेढ्यात येऊन गल्लोगल्लीत फिरावं लागत आहे. फारशा महत्त्वाच्या नसलेल्या लोकांच्या भेटीगाठी घ्याव्या लागत आहेत. हा अजित पवारांचा स्वभाव नाही, असा खोचक टोला पाटील यांनी लगावला.रोहित पवार म्हणाले, "राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण..."'अजित पवारांना काय झालंय माहीत नाही. ते अलीकडे जरा जास्तच जोरात आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मी पीएचडी करणार असल्याचं म्हटलं होतं आता मी अजित पवारांवर एम. फिल. करणार आहे. कारण इतकं सगळं करूनही ते छातीठोकपणे बोलत आहेत. त्यांची सिंचन प्रकरणी चौकशी सुरू आहे. बँक घोटाळा प्रकरणात त्यांचं नाव आहे. राज्यातले अनेक साखर कारखाने अडचणीत येतात आणि अजित पवार ते खरेदी करतात. अजित पवारांचे नेमके किती साखर कारखाने आहेत, हे त्यांनी एकदा सांगावं,' असं पाटील म्हणाले.मुख्यमंत्री ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र; मोदींकडे केल्या दोन महत्त्वाच्या मागण्या'सत्तेत असलेल्या व्यक्तीनं नम्र राहावं. पण अजित पवार नाक वरून चालत आहेत. सरकार कोणाचंही असलं तरी हेच उपमुख्यमंत्री होतात आणि इतकं सगळं करूनही ते अशी विधानं करतात. या सगळ्यासाठी हिंदीत 'सौ चुहे खाके बिल्ली चली हज' अशी एक म्हण आहे. कालचक्र सतत फिरत असतं. त्यामुळे अजित पवारांनी फार गमजा मारू नयेत. त्यांनी नीट बोलावं,' असा इशारा पाटील यांनी दिला.सरकार पडणार नाही असं अजित पवारांना सारखं का सांगावं लागतं, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. सरकार पडणार नसल्याचा विश्वास असेल तर मग इतकं आकांडतांडव कशासाठी करता? आम्ही काही सत्ताबदलाची आस लावून बसलेलो नाही. पण राज्यात सत्ताबदल कसा होणार हे अजित पवारांना माहीत आहे. ते सध्या खोटा आव आणत आहेत, अशा शब्दांत पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला. मला चंपा म्हणणं बंद करा. अन्यथा मग मीदेखील पार्थ पवार आणि इतरांचे शॉर्टफॉर्म सांगेन, असा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाparth pawarपार्थ पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBharat Bhalkeभारत भालके