शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

'...तोपर्यंत गळ्यात हार आणि डोक्याला फेटा बांधणार नाही'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 8:48 AM

Pankaja Munde on reservation: बीडमध्ये आयोजित भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पंकजा मुंडे बोलत होत्या.

बीड: 'मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण(Maratha Reservation) मिळत नाही आणि ओबीसी समाजाचे(OBC Reservation) राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही, तोपर्यंत गळ्यात हार आणि डोक्याला फेटा बांधणार नाही', अशी घोषणा भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली आहे. बीडमध्ये आयोजित भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत असताना पंकजा यांनी ही घोषणा केली.

या वेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, 'मी आता ही लढाई लढायचं ठरवलंय. बीड जिल्ह्यानं एक वेगळं उदाहरण घालून दिलं पाहिजे. ज्याला आज खुर्चीवर बसायचंय, त्याला हेच पाहिजे. आपसात भांडा आणि मरा. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हे नाही केलं. सोशल इंजिनिअरिंग करणारा जगातील पहिला माणूस कोण असेल तर ते शिवाजी महाराज होते. मुंडे साहेबांना विचारलं तुमचं राजकीय गुरु कोण, तर ते म्हणायचे मी राजकारण करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य कारभार डोळ्यासमोर ठेवतो,' असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा पुढे म्हणाल्या की, 'माझे इतर पक्षांमध्येही चांगले संबंध आहेत. मला वाटतंच नाही की मुख्यमंत्री बदललेत. गोपीनाथ गडावर भागवत कराड आले म्हणून मला विचारलं, तेव्हा मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे येऊन गेले,  छगन भुजबळ मंत्री झाल्यावर आले होते, दोन्ही छत्रपती येऊन गेले अमित शहा येऊन गेले सगळं घेऊन गेले गोपीनाथ गड ही लोकनेते मुंडे साहेबांची समाधीस्थळ आहे,' असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

बीडमध्ये नंबर दोनचे धंदे वाढलेभाषणादरम्यान पंकजा यांनी नाव न घेता धनंयज मुंडे यांच्यावरही निशाणा साधला. 'जिल्हा नियोजन बैठकीत अभियंता का येत नाही ? तुम्ही विकले गेलेले अधिकारी आणता. माझ्या वेळी अवैध धंदे होत होते का? आता तर माझ्या मतदारसंघांमध्ये एवढे नंबर 2 चे धंदे झालेत, पाहिजे तेवढ्या हातभट्ट्या लावा पाहिजे तेवढी दारूचे दुकान टाका, मटके तर उघडून ठेवले, जुगार वाढला आहे, जिल्ह्यामध्ये कशाला लोक पोलिसांना घाबरतील. प्रतिमा आणि प्रतिष्ठा मिळविण्याची लायकी कुणाकडे असते आणि कुणाकडे नसते, असं म्हणत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंना टोला लगावला. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेPritam Mundeप्रीतम मुंडेBeedबीडparli-acपरळी