शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
2
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
3
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
4
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
5
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
6
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
7
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण
8
काँग्रेसचा प्रचार धडाका! राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगेंसह प्रमुख नेते महाराष्ट्रात
9
"जिवंत राहिले तर...!"; सुजलेल्या चेहऱ्यासह फोटो शेअर करत साध्वी प्रज्ञा सिंह यांचा काँग्रेसवर आरोप
10
सौरव गांगुलीचा सल्ला अन् भारताच्या स्टार खेळाडूनं 'निवृत्ती'चा निर्णय बदलला, म्हणाला...
11
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट, आरोपींनी आधीच शस्त्रे लपवली होती, पुण्यातून आणखी दोन जणांना अटक
12
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
13
Gold Rates Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', जोरदार आपटलाय भाव! पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
14
३५४ मतदार... झोपडीतील मतदान केंद्र...; २० किमी पायपीट करून निरीक्षकांनी केली पाहणी
15
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
16
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
17
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
18
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
19
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
20
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती

Pankaja munde: ...तर भागवत कराडांच्या शपथविधीला गेले असते; पंकजा मुंडेना 'एकाच' गोष्टीचे शल्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 2:21 PM

Pankaja munde talk on Bhagvat Karad: जोपर्यंत शक्य आहे तोवर धर्मयुद्ध टाळायचा प्रयत्न करणार, मी कुणालाही घाबरत नाही, माझ्यावर निर्भिड राजकारणाचे संस्कार, असे वक्तव्य आज पंकजा मुंडे यांनी नाराज पदाधिकाऱ्यांसमोर केले.

भागवत कराडांना (Bhagvat Karad) मंत्रिपद दिल्याने नाराज नाही. त्यांच्या शपथविधीलाही गेले असते, परंतू दुर्दैवाने मला हे उशिरा समजले, यामुळे कार्यकर्तेही नाराज झाले, असे पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले. (Why Pankaja Munde not went to Bhagvat Karad's minister oath?)Pankaja munde: जेव्हा मला वाटेल, आता राम उरला नाही, तेव्हा...; पंकजा मुंडेंचा सूचक इशारापंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांनी नुकत्याच केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रितम मुंडे (Pritam munde) यांना स्थान न दिल्याने मुंडे समर्थक नाराज झाले आहेत. यामुळे बीड जिल्ह्यासह राज्यभरात ७० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यानंतर आज हे समर्थक पंकजा मुंडे (Pankaja munde) आणि प्रीतम मुंडे यांना भेटण्यासाठी मुंबईला गेले आहेत. या कार्यकर्त्यांना पंकजा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कोरोनाच्या नियमांना हरताळ फासण्यात आला. यावेळी पंकजा यांना बोलताना माईकच्या तांत्रिक बिघाडाला बराचवेळ सामोरे जावे लागले.

जोपर्यंत शक्य आहे तोवर धर्मयुद्ध टाळायचा प्रयत्न करणार, मी कुणालाही घाबरत नाही, माझ्यावर निर्भिड राजकारणाचे संस्कार, असे वक्तव्य आज पंकजा मुंडे यांनी नाराज पदाधिकाऱ्यांसमोर केले. पक्षाने मला खूप दिलंय, पक्षाने दिलेलं मी लक्षात ठेवते, जे दिलं नाही ते तुम्ही लक्षात ठेवा, असेही त्यांनी सांगितले. याचबरोबर दु:खी चेहऱ्याने आलात, ते माझ्या पदरात टाका आणि माझ्या चेहऱ्यावरील हसू तुम्ही घेऊन माघारी जा, असे आवाहन पंकजा यांनी या कार्यकर्त्यांना केले. 

Pankaja munde: ...म्हणून मी तुमचे राजीनामे नामंजूर करते; पंकजा मुंडेंची 'नाराज' मेळाव्यात घोषणासंघटनेच्या कामासाठी दिल्लीला गेले होते. मला कोणी झापले नाही. मोदींना अत्यंत सन्मानाची वागणूक दिली. वेळ दिला चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर राज्यातील राजकारणाबाबत पंकजा यांनी कोणाचेही नाव न घेता टोले लगावले. यासाठी त्यांनी महाभारतील उदाहरणे दिली. कौरवांसोबत रथी महारथी होते, परंतू ते फक्त शरीराने त्यांच्यासोबत होते. मनाने ते पांडवांसोबत होते. तसेच आहे, माझा नेता मोदी, माझा नेता अमित शाह आणि जे. पी. नड्डा असे सांगत पंकजा यांनी एकप्रकारे राज्यातील नेत्यांना इशारा दिला आहे. 

पत्रकार परिषदेत काय म्हणाल्या...पक्ष संघटनेची चर्चा असल्याने त्याची कुठेही वाच्यता करायची नाही असा नियम असल्याने मी त्यावर बोलणार नाही.  मंत्रिपदाची मागणी केली नाही, त्यामुळे दिल्लीत मला त्यावर बोलावे लागले नाही. फक्त जे पी नड्डांच्या कानावर कार्यकर्त्यांच्या राजीनाम्यांची गोष्ट घातली. त्यांनी सांभाळून घेण्य़ास सांगितले, असे पंकजा म्हणाल्या. धर्मयुद्धाबाबतही पंकजांनी भाष्य केले. जेव्हा एखादा व्यक्ती राज्यभर प्रवास करून एक संघटना उभी करतो. त्याचा आणि कार्यकर्त्यांमध्ये विसंवाद होतो. आपल्या विचारांशी असलेला संघर्ष होतो. लोकांची जोडलेली मोट सुटू नये यासाठी लढावे लागतेय, असे पंकजा यांनी म्हटले. पक्षात राम राहिला नाही, तेव्हा बघू या वक्तव्यावर पंकजा यांना विचारले असता पंकजा यांनी हसत तशी वेळ येवू नये असे म्हणत उत्तर देणे टाळले. 

माझ्या समाजाचा अपमान का करू...प्रीतम मुंडेंची मंत्रीपदाची कुवत असताना त्यांना मिळाले नाही. आज भागवत कराड यांचे वय ६५, माझे ४२. मग माझ्या समाजाचा अपमान मी कसा करू, असे देखील त्या म्हणाल्या. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारBJPभाजपा