Pankaja Munde News: माझ्या डोळ्यात पाणी पाहून तुम्ही असे वागलात, तर तुमच्या डोळ्यातील पाणी पाहून मी कशी वागू, सांगा असा सवाल पंकजा यांनी कार्यकर्त्यांना केला. दबावंत्रासाठी मला ही जागा पुरणार नाही. मला त्यासाठी मोठी सभा घ्यावी लागेल. पंकजा दिल्लीला गेली, काहींनी बातमी केली की मोदींनी मला झापले वगैरे. माझ्या चेहऱ्यावरून असे वाटतेय का? असा सवाल पंकजा यांनी केला. मोदी, नड्डा यांच्यासोबत मी चर्चा केली. त्यांना राजीनामे जे दिले ते नाराजीतून दिलेत. मी पत्रकार परिषद घेऊनही राजीनामे दिलेत. यावर नड्डा यांनी तुम्ही त्यांना समजावण्यात यशस्वी व्हाल, एवढीच चर्चा झाल्याचा खुलासा पंकजा यांनी केला. (Pankaja munde announce her stand on Cabinet Exasion, PM Modi meet in front of Party workers of beed.)
Pankaja munde: ...म्हणून मी तुमचे राजीनामे नामंजूर करते; पंकजा मुंडेंची 'नाराज' मेळाव्यात घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांनी नुकत्याच केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रितम मुंडे (Pritam munde) यांना स्थान न दिल्याने मुंडे समर्थक नाराज झाले आहेत. यामुळे बीड जिल्ह्यासह राज्यभरात ७० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यानंतर आज हे समर्थक पंकजा मुंडे (Pankaja munde) आणि प्रीतम मुंडे यांना भेटण्यासाठी मुंबईला गेले आहेत. या कार्यकर्त्यांना पंकजा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कोरोनाच्या नियमांना हरताळ फासण्यात आला. यावेळी पंकजा यांना बोलताना माईकच्या तांत्रिक बिघाडाला बराचवेळ सामोरे जावे लागले.
दिल्लीतील भेटीत पक्ष संघटनेवर चर्चा झाल्याचे पंकजा यांनी सांगितले. आपण बांधलेले घर का सोडायचे, असा सवाल पंकजा यांनी केला. मला जेव्हा वाटेल की आता यात राम नाही तेव्हा बघू, माझे नेते मोदी, शहा, नड्डा आहेत. केंद्रीय, राज्यात मंत्री नसले म्हणून काय झाले, मी राष्ट्रीय मंत्री आहे, अशा शब्दांत पंकजा यांनी नाराज कार्यकर्त्यांची समजूत घातली.
मी निवडणूक हरले असले तरी संपले नाही...
डोळे चोळून पाहू, असे म्हटल्यावर कार्यकर्त्यांनी दोनतीनदा डोळे चोळले असे काही कार्यकर्त्यांनी सांगितले. यावर तुम्हाला राजीनामे द्यायला लावून मी मंत्रिपद मिळवले तर मी लहान नेता होईन, मोठा होणार नाही. पक्षाने संघर्ष यात्रा काढल्यानंतर सत्ता आल्यावर मंत्री केले. तेव्हादेखील तुम्ही नाराज झाला होता. मी नाव केले की नाही. हीच आपली शक्ती आहे, असे पंकजा यांनी सांगितले. मी निवडणूक हरले असले तरी संपले नाही. संपले असते तर मला संपविण्याचे प्रयत्नदेखील त्यांचे संपले असते. मी आहे. अविचाराने कोणताही निर्णय का घ्यायचा का, असा सवाल केला.
प्रीतम मुंडेंची मंत्रीपदाची कुवत असताना त्यांना मिळाले नाही. आज भागवत कराड यांचे वय ६५, माझे ४२. मग माझ्या समाजाचा अपमान मी कसा करू, असे देखील त्या म्हणाल्या. मला पंतप्रधान व्हायचे असे काही नेते म्हणतात, मग काय करायचे? असा सवालही पंकजा यांनी केला. माझ्या चेहऱ्यावरील आनंद तुम्ही घेवून जा, तुमचे दु:ख माझ्या पदरात टाका, आणि हसऱ्या चेहऱ्याने परत जिल्ह्यात जा, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.