शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

...तर आदरणीय शरद पवारांना जाब विचारायला हवा; काँग्रेस नेत्याचा थेट हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 8:31 AM

congress leader sanjay nirupam takes dig at ncp chief sharad pawar: काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा थेट शरद पवारांवर निशाणा; काँग्रेस नेत्यांनी ठोस भूमिका घेण्याची अपेक्षा व्यक्त

मुंबई: मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) लिहिलेल्या पत्रामुळे राज्यात खळबळ माजली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सचिन वाझेंना (Sachin Vaze) दर महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी पत्रात केला आहे. त्यांच्या या पत्रामुळे राज्यात भूकंप झाला आहे. तर अनिल देशमुख यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत."आता कळलं का? वाझे नोटा मोजण्याची मशीन घेऊन का फिरत होता"परमबीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. शरद पवार यांना या सगळ्याची कल्पना होती, असं परमबीर सिंग यांनी पत्रात नमूद केलं आहे. यावरून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी थेट शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. 'परमबीर सिंग यांच्या आरोपांमध्ये तथ्य असल्यास, त्यांचे दावे खरे असल्यास आदरणीय शरद पवारजींना जाब विचारायला हवा. कारण तेच महाराष्ट्र सरकारचे शिल्पकार आहेत. तथाकथित तिसरी आघाडी हेच करणार आहे का?', असा सवाल निरुपम यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसनं या विषयात ठाम भूमिका घ्यायला हवी, अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली आहे. मनसुख हिरेन यांची हत्या?; अनिल देशमुख यांच्या ट्विटमधील 'त्या' शब्दाने भुवया उंचावल्याशरद पवारांच्या 'त्या' विधानाचा निरुपम यांच्याकडून समाचारकेरळमधील काँग्रेस नेते पी. सी. चाको यांनी १० मार्चला पक्षाला रामराम केला. चारच दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी शरद पवारांनी तिसऱ्या आघाडीवर भाष्य केलं. देशाला तिसऱ्या आघाडीची गरज आहे. यासंदर्भात काही नेत्यांशी माझं बोलणं झालं आहे. सीपीआय एमचे प्रमुख सीताराम येचुरी यांनी याबद्दल सकारात्मक भूमिका घेतली आहे, असं पवार यांनी सांगितलं होतं. आता निरुपम यांनी तिसरी आघाडी हेच करणार आहे का, असा सवाल करत थेट पवारांना लक्ष्य केलं आहे.वाझे प्रकरण म्हणजे सरकार पुरस्कृत वसुली कांडसंजय निरुपम यांनी आधीही सचिन वाझे प्रकरणावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. 'या प्रकरणात आयुक्तांची चूक होती या गृहमंत्र्यांच्या विरोधाभासी विधानामुळे सरकारची प्रतिमा आणखी मलीन होईल. वाझे प्रकरणाच्या आतापर्यंतच्या तपासातून हे सरकार पुरस्कृत हफ्ता वसुली कांड असल्याचं दिसून येतं. याचे धागेदोरे शिवसेनेपर्यंत जातात का?', असा प्रश्न निरुपम यांनी ट्विट करून उपस्थित केला होता.

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगAnil Deshmukhअनिल देशमुखSanjay Nirupamसंजय निरुपमSharad Pawarशरद पवारShiv Senaशिवसेना