केरळमधील काँग्रेसचे माजी खासदार पीसी चाको यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिली होता. आज ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार असून सायंकालपर्यंत एकत्र पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. चाको हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. ( A week after Senior leader PC Chacko resigned from Congress, it is likely that he will join the Nationalist Congress Party (NCP), according to reports.)
पीसी चाको यांनी सांगितले की, मी थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना भेटणार आहे. मी जो काही काँग्रेस पक्षात संघर्ष केला तो त्यांना सांगणार आहे. याचबरोबर मी सीताराम येच्युरी आणि गुलाब नबी आझाद यांच्याशीही बोलून पुढील दिशा ठरविणार आहे. मी केरळ निवडणुकीमध्ये एलडीएफला पाठिंबा जाहीर करणार आहे. तसेच शरद पवारांशी बोलल्यानंतर राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय घेणार आहे.
आघाडीत उभी फूट! काँग्रेसविरोधात शरद पवारांनी विरोधकांची मोट बांधली; ममतांसाठी प्रचार करणार
केरळमध्ये दोन आघाड्या आहेत. एक काँग्रेसप्रणित आणि दुसरी डाव्यांची. मी आता काँग्रेस सोडल्याने माझे निर्णय घेण्यासाठी मोकळा आहे. मी एलडीएफला उघडपणे पाठिंबा देऊ शकतो, असे चाको यांनी सांगितले.
केरळमध्ये लोकशाही पद्धतीने उमेदवारांची निवड झाली नसल्याचा आरोप चाको यांनी काँग्रेसवर केला होता. यानंतर त्यांनी 10 मार्चला काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. केरळ काँग्रेसमध्ये दोन गट असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. उमेदवारांबाबत या दोन गटांनाच माहिती होती. आपल्याला अंधारात ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. केरळमध्ये लोकांना काँग्रेस पुन्हा सत्तेत हवी आहे, मात्र गटबाजीमुळे आणि चुकीचे उमेदवार दिल्याने ते होणार नाही, असा आरोपही त्यांनी केला होता. चाको हे थ्रिसुर लोकसभा मतदारसंघातून 2009 मध्ये खासदार झाले होते.