शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

लोकशाहीवर आघात करणाऱ्या करणाऱ्यांना जनतेनं धडा शिकवला- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 9:02 PM

देशातील सध्यपरिस्थितीवर शरद पवारांचं सूचक विधान

नवी दिल्ली: केंद्राचे कृषी कायदे आणि त्याविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक विधान केलं आहे. देशात लोकशाहीचा विचार रुजला आहे. त्यामुळे लोकशाहीच्या विरोधात वर्तन करणाऱ्या कोणत्याही पक्षाला देशातील जनतेनं सोडलेलं नाही. त्यांना धडा शिकवला आहे, असं शरद पवार म्हणाले. सध्या देशात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती पवार यांचं हे विधान अतिशय सूचक मानलं जात आहे.एका पदावरून तीन पक्षांत रंगणार रस्सीखेच; 'पॉवर'फुल विधानामुळे महाविकास आघाडीत नवा पेच?पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांनी इतिहासातील महत्त्वाचे दाखले दिले. आणीबाणीच्या कालखंडात लोकशाहीच्या बाजूनं उभ्या राहिलेल्या हजारो लोकांना अटक झाली. त्या कालावधीत जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्त्वाखाली चळवळ उभी राहिली. पुढील निवडणुकीत पंतप्रधान इंदिरा गांधींचा पराभव झाला. त्यांना सत्ता सोडावी लागली. इंदिरा गांधींसारख्या मातब्बर नेतृत्त्वालादेखील जनतेनं धडा शिकवला, असं पवार म्हणाले. ".. पण आंदोलनकर्त्यांना १० एकरात १०० कोटींची वांगी लावण्याचा मंत्र मात्र न चुकता द्या"देशातील जनतेच्या मनात लोकशाहीबद्दल श्रद्धा आहे. त्यामुळे लोकशाहीला नख लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनताच बाजूला करते. लोकशाहीला धोका पोहोचवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन केली. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला सत्तेपासून दूर ठेवता आलं. लोकशाहीसाठी असे प्रयोग देशात होण्याची गरज असल्याचं मत पवार यांनी व्यक्त केलं.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसIndira Gandhiइंदिरा गांधी