म्हसळा : भगवान श्रीकृष्णांनी महाभारतात सांगितलेल्या भगवद्गीतेप्रमाणे आणि शाहू, फुले, आंबेडकर यांच्या सर्वधर्म समभाव शिकवणीच्या विचारसरणीचे पालन करून, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेच्या स्वराज्याची निर्मिती केली. हाच आदर्श मानून सर्व जाती-धर्मातील लोकांना, समाज घटकांना सोबत घेऊनच अविरतपणे जनसेवा करीत राहणार आहे. आगामी काळात पाच वर्षे आघाडीचाच खासदार म्हणून काम करणार असल्याचे प्रतिपादन सुनील तटकरे यांनी केले आहे.म्हसळा येथील आयोजित आघाडीच्या प्रचारसभेत आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे बोलत होते. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात गाववाडी-वस्तीवर आघाडी सरकारच्या काळात आमदार, राज्यमंत्री, जलसंपदामंत्री व दोन्ही जिल्ह्यांचा पालकमंत्री म्हणून काम करताना सहकारी मंत्र्यांना सोबत घेऊन शासनाच्या विविध योजनांतून कोट्यवधी रु पयांची विकासकामे केली आहेत याचा आनंद व अभिमान आहे, असे सांगून आतासुद्धा केंद्रात व राज्यात सत्ता नसतानादेखील विद्यमान युती सरकारमधील मंत्र्यांकडून कोट्यवधी रु पयांचा विकासनिधी मतदारसंघात उपलब्ध करून देण्यास यशस्वी झालो आहे, असे सांगून जिल्ह्यातील जनतेचे आणि माझे नाते अतूट आहे, असा विश्वास व्यक्त केला.तसेच माझे राजकारण किंवा समाजकारण फक्त एका समाजापुरते मर्यादित नसून आगरी, कोळी, कुणबी, मराठा, धनगर, आदिवासी अशा विविध जाती-जमातीच्या व बौद्ध, मुस्लीम अशा सर्व धर्मीयांच्या लोकांना सोबत घेऊन त्यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण करणारे आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका अशा विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्व समाज घटकातील लोकांना सरपंच, सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक अशा विविध पदांवर लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून देता आली, याचे समाधान आहे. समाजाच्या नावावर मते मागणाऱ्या अनंत गीते यांनी समाजासाठी काय केले आहे, याचेही उत्तर दिले पाहिजे. त्याचबरोबर विकासकामे करता आली नाहीत त्यामुळे आता माझ्यावर वैयक्तिक टीका करण्याचा एकमेव मार्ग अवलंबिलेल्या गीतेंनी टीका करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यांवर बोलावे, असे जाहीर आवाहन अनंत गीतेंना करून जे गीते स्वत:ला स्वत: मतदान करू शकत नाहीत ते जनतेचा काय विकास करणार, असा रोखठोक सवाल गीतेंना केला आहे.काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार माणिक जगताप यांनी आपल्या भाषणाच्या सुरु वातीपासून अनंत गीतेंवर आगपाखड के ली. फक्त भावनिक राजकारण करून गीतेंनी इतके वर्षे खासदारकी उपभोगली; परंतु त्यांनी मतदारसंघात कोणताही ठोस विकास केला नसल्याची टीका केली. या वेळी आमदार पंडित पाटील, आ.अनिकेत तटकरे, काँगेस महिला जिल्हा अध्यक्षा श्रद्धा ठाकूर, ज्येष्ठ नेते अली कौचाली, अल्पसंख्याक सेल जिल्हा अध्यक्ष नाझीम हसवारे आदी उपस्थित होते.
'सर्व जाती-धर्मातील लोकांना घेऊन जनसेवा करणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 1:41 AM