जयपूर : राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील एक गाव सट्टा, मटका लावण्यासाठी सर्वदूर प्रसिद्ध आहे. क्रिकेट, निवडणुका इथपासून पाऊस होईल की नाही, यावरही येथे सट्टा खेळला जातो. फलोदी असे गावाचे नाव. येथील व्यवहारांमध्ये कोट्यवधींची उलाढाल होते. मुंबईपासून देशभरात येथील सट्टेबाजांचे ‘नेटवर्क’ असून, सट्टा बाजाराची माहिती त्यांच्यापर्यंत येते.जिंकले तर खात्यात ‘मोबाइल वॉलेट’च्या माध्यमातून पैसे टाकले जातात. ‘खाणे’ (खाना)आणि लावणे (लगाना) हे येथे परवलीचे शब्द आहेत. खाणे या शब्दाचा अर्थ जिंकण्याची शक्यता कमी. ‘लावणे’ या शब्दाचा अर्थ जिंकण्याची चांगली शक्यता.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलोदामध्ये बिहार, उत्तर प्रदेश, कोलकाता आणि बहुतेक सर्व ठिकाणांवरून लोक येतात. वेगवेगळ्या ठिकाणी कोणती जातीय समीकरणे आहेत, हे सांगतात. इथले सट्टामालक सकाळी १० वाजता ठरलेल्या भावाने ‘मार्केट’ उघडतात. सायंकाळी ५ पर्यंत हे ‘मार्केट’सुरु राहते.>कशावर लागतो सट्टा ?
‘आयपीएल’च्या स्पर्धेपासून अमेरिकेच्या अध्यक्षांच्या निवडणुकीपर्यंत प्रत्येक मुद्दावर नशीब आजमाविले जाते. येथे पावसावरही सट्टा लावला जातो. आकाशात काळे ढग दाटून आले की, पुढच्या १५ दिवसांच्या पावसाची भविष्यवाणी केली जाते.विधानसभा निवडणुकीत फलोदी गावाने म्हणे कोट्यवधींचा धंदा केला. फलोदीच्या कर्त्या पुरुषांचे पोटपाणी फक्त सट्ट्यावरच चालते. मुंबई शेअर बाजारातही फलोदीतील बरेच जण ‘मार्केट’वर खाली करतात. फलोदी गावापासून काही अंतरावरच पोलीस ठाणे आहे. मात्र, त्याची दखल घेणे या गावाला व्यवहार्य वाटत नाही. उघडपणे गर्दीच्या परिसरात बोली लावली जाते. सतत आकडे उच्चारले जातात.>रोजगार नाही म्हणून...रोजगारासाठी येथे कसलीच कंपनी नाही किंवा कारखाना नाही. शालेय शिक्षण झाले की, पुढच्या शिक्षणासाठी किंवा रोजगारासाठी लोकांना शहरात जावे लागते, असे स्थानिक नागरिकांचे गाºहाणे आहे.