Pegasus spyware: नरेंद्र मोदींच्या नव्हे, तर मनमोहन सिंग यांच्या काळात फोन टॅपिंग झाली, देवेंद्र फडणवीस यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 04:04 PM2021-07-20T16:04:15+5:302021-07-20T16:07:08+5:30
Pegasus spyware attack: केंद्र सरकारने कुणाचेही फोन टॅप केले नाहीत, विरोधकांचे आरोप दिशाभूल करणारे
नवी दिल्ली: सध्या देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात फोन टॅपिंग प्रकरणावरुन प्रचंड गोंधळ माजलाय. केंद्र सरकारने इस्रायलच्या पेगासस(Pegasus spyware) या सॉफ्टवेअरद्वारे फोन टॅप केल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय. दरम्यान, या प्रकरणावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी भाष्य केलं आहे. 'भाजप सरकारने कुणाचेही फोन टॅप केले नाहीत, उलट मनमोहन सिंग यांच्याच काळात फोन टॅप झाले', असा दावा फडणवीसांनी केलाय.
पेगसासद्वारे भारतातील अनेक पत्रकार, नेते आणि उद्योजकांचे फोन टॅप केल्याचा दावा काही आंतरराष्ट्रीय माध्यांनी केला. यासंबंधी बातम्या समोर आल्यानंतर देशभर खळबळ उडाली. या प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले. 'फोन टॅपिंग नरेंद्र मोदींच्या काळात नाही, तर तत्कालीन मनमोहन सिंग सरकारच्या काळात झाली, असा आरोप त्यांनी केला. तसेच, मंत्रिमंडळाचा विस्तार करून सर्व जातीधर्माच्या लोकांना नरेंद्र मोदींनी संधी दिली. त्यामुळे अधिवेशन डिरेल करण्याच्या उद्देशान अधिवेशनाच कामकाज डिस्टर्ब केल जात आहे. पॅगसेसच्या बातमीला कोणताही आधार नाही. भारत सरकारची कोणतीही एजन्सी अश्या कोणत्याही पद्धतीची हॅकींग करत नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं.
मनमोहन सिंगांकडून समर्थन
फडणवीस पुढे म्हणाले की, भारतातील टेलिग्राफ अॅक्टनुसार आपल्याला हवी ती माहिती मिळू शकते. त्यामुळ फोन टॅपिंग करण्याची गरजच नाही. सबंधित विभागानं अश्या बातम्या देणाऱ्यांना नोटीस दिली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, तत्कालीन मनमोहन सिंग यांच सरकार फोन टॅपिंग करतंय असाही आरोप झाला होता. समजावादी पार्टीचे नेते अमरसिंह यांनी सर्वात आधी हा आरोप केला होता. तेव्हा उत्तर देताना मनमोहन सिंग यांनी आम्ही नाही तर एका खासगी एजन्सीने फोन टॅपिंग केले आहेत, आणि जे काम झालंय ते लिगली झालंय, अस त्यांनी सांगितलं होतं, अशी माहिती फडणवीसांनी दिली.
देशाच्या बदनामीचा अजेंडा
फडणवीस पुढे म्हणाले की, पेगाससमध्ये 45 देशांचा उल्लेख आहे. पण चर्चा फक्त भारताची होत आहे. हे जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या हेतून होत आहे. एक-दोन मीडिया हाऊसला चायनीज फंडिंग मिळतीये आणि त्यातून एक बदनामीचा अजेंडा राबवला जातोय. हे भारताला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.