हणमंत पाटीलपिंपरी : आगामी महापालिका निवडणुकीत लोकशाही आघाडीचे घटक पक्ष एकत्र लढतील की नाही, हे अनिश्चित आहे. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षाच्या वरिष्ठांनी स्थानिक नेत्यांना ताकत देण्यास सुरवात केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे सारथ्य लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार करणार असल्याने त्यांच्या विरोधात शिवसेनेने खासदार श्रीरंग बारणे यांना बळ देण्यास सुरुवात केली आहे.पिंपरी चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक अवघ्या १० महिन्यावर आली आहे. त्यादृष्टीने महापालिकेतील सत्ताधारी भाजप व विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वरिष्ठांनी नेत्यांनी पदाधिकारी व नगरसेवकांच्या बैठका सुरू केल्या. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवकांना पुण्यात शुक्रवारी झालेल्या बैठकीत खडे बोल सुनावले, तसेच निवडणुकीच्या तयारीला लागण्यास सांगितले.दुसऱ्या बाजुला राज्यातील सत्ताधारी शिवसेनेनेही महापालिका निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरवात केल्याचे दिसते. निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांशी सलगी असलेले शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांचा राजीनामा घेतला. त्यानंतर शहराची संपूर्ण सूत्रे अजित पवार यांचे कट्टर विरोधक असलेले खासदार बारणे यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यानंतर बारणे यांचे समर्थक असलेले नगरसेवक सचिन भोसले यांनी शिवसेना शहरप्रमुख व गजानन चिंचवडे यांची जिल्हा प्रमुखपदी फेरनिवड करण्यात आली. लवकरच शिवसेना महापालिका गटनेतेपदी बारणे समर्थक अश्विनी चिंचवडे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.एका बाजुला पार्थ पवार राष्ट्रवादीचे महापालिका निवडणुकीत सारथ्य करणार असल्याची चाहूल लागल्याने शिवसेनेनेही बारणे यांच्या हाती शहराची संपूर्ण सूत्रे दिली आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम होण्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.राहुल कलाटे यांच्याकडून चाचपणीस्थायी समिती सदस्य निवडीत शिवसेना पक्षाचे आदेश न पाळल्याचे निमित्त करीत राहुल कलाटे यांचा गटनेतेपदाचा राजीनामा घेण्यात आला. त्यामुळे खासदार बारणे यांच्यासाठी महापालिका कारभारातील अडथळा आपोआप बाजूला गेला. राजीनामा दिल्यानंतर अवघ्या काही दिवसांत राहुल कलाटे यांनी विकास कामाच्या निमित्ताने भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट घेतली. त्यामुळे राजकीय भवितव्यासाठी राहुल कलाटे चाचपणी करीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवारांना शह देण्यासाठी शिवसेनेची रणनीती; 'दादां'च्या विरोधकामागे उभी केली शक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 9:55 AM
आगामी महापालिका निवडणूक : राजकीय पक्षाकडून स्थानिक नेत्यांना रसद
ठळक मुद्देराहुल कलाटे यांच्याकडून चाचपणीराष्ट्रवादीचे सारथ्य पार्थ पवार करणार असल्याने त्यांच्या विरोधात शिवसेनेने श्रीरंग बारणे यांना बळ देण्यास सुरुवात केली आहे