नवी दिल्ली - सलग दोन लोकसभा निवडणुकीत झालेले पराभव आणि काही राज्यांमधील सत्ता संपुष्टात आल्याने राजकीयदृष्ट्या कमकुवत झालेल्या काँग्रेसमध्ये सध्या मोठा वाद उफाळून आला आहे. त्यातच काही जेष्ठ नेत्यांनी सोनिया गांधीना पत्र लिहून नेतृत्व बदलाबाबत मागणी केली होती. त्यावरून या नेत्यांनी भाजपाशी हातमिळवणी केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केल्याने काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते संतप्त झाले. दोन दिवस चाललेल्या नाट्यानंतर अखेर काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत मोठा निर्णय झाला आहे.
पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांनाच कायम ठेवण्याचा निर्णय काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. देशभरातील काँग्रेसच्या 23 वरिष्ठ नेत्यांनी पक्षात मोठ्या बदलांची गरज असल्याचं मत त्यांनी पत्रातून व्यक्त केलं आहे. पाच महिन्यांपूर्वीच याबाबत अनौपचारिक चर्चा सुरू झाल्याची माहिती आता मिळत आहे. काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांच्या निवासस्थानी एका डिनर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पक्षांतर्गत बदलांसंदर्भात चर्चा सुरू झाल्याचा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
काँग्रेस अनेक नेते थरुर यांच्या निवासस्थानी झालेल्या डिनरला हजर होते. हिंदुस्थान टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, सोनिया गांधी यांना पाठवण्यात आलेल्या पत्रावर डिनरला उपस्थित असलेल्या बहुतांश नेत्यांनी स्वाक्षरी केली नाही. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम, त्यांचा मुलगा कार्ती चिंदबरम, सचिन पायलट, अभिषेक मनू सिंघवी आणि मणिशंकर अय्यर डिनरच्या निमित्ताने झालेल्या या अनौपचारिक बैठकीला उपस्थित होते. मात्र त्यांनी या पत्रावर स्वाक्षरी केलेली नाही.
अभिषेक मनू सिंघवी यांनी डिनरला आपणही उपस्थित असल्याची पुष्टि दिली आहे. "शशी थरुर यांनी मला डिनरचे आमंत्रण दिले होते. पक्षामध्ये सुधारणांसदर्भात त्या बैठकीत अनौपचारिक चर्चा झाली. पण या पत्रासंबंधी मला काही माहीत नव्हते" असं सिंघवी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष गरजेचा असल्याची महत्त्वाची मागणी 23 नेत्यांनी पत्रातून केली. यामध्ये काँग्रेस कार्यसमितीच्या अनेक सदस्यांसह, पाच माजी मुख्यमंत्री, खासदार आणि माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.
पत्रावर कोणाच्या स्वाक्षऱ्या?
पक्ष जनाधार आणि तरुणांचा विश्वास गमावत आहे. पक्षाला प्रभावी नेतृत्त्वाची गरज आहे. तो केवळ काम करताना दिसू नये, तर त्याचं काम प्रत्यक्ष जमिनीवर दिसायला हवं. सीडब्ल्यूसीची निवडणूक व्हायला हवी आणि पक्षाला पुन्हा उभारी घ्यावी यासाठी ठोस योजना तयार करायला हवी, असं 23 नेत्यांनी पत्रात म्हटलं आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाम, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनीष तिवारी, शशी थरूर, खासदार विवेक तनखा, AICC आणि CWC चे मुकुल वासनिक आणि जितिन प्रसाद, माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, राजेंद्र कौर भटट्ल, वीरप्पा मोइली, पृथ्वीराज चव्हाण, पी. जे. कुरियन, अजय सिंह, रेणुका चौधरी आणि मिलिंद देवरा, प्रदेशाध्यक्ष सांभाळण्याचा अनुभव असलेले राज बब्बर, अरविंदर सिंह लवली, कौल सिंह यांच्यासह अखिलेश प्रसाद सिंह, कुलदीप शर्मा, योगानंद शास्त्री आणि संदीप दीक्षित यांच्या पत्रावर स्वाक्षऱ्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
Video - "राजकारणातून गांधी-नेहरु परिवाराचं अस्तित्व संपलं"; भाजपा नेत्याने साधला निशाणा
लयभारी! शेतात काम करण्यासाठी मजुरांची गरज; शेतकऱ्याने पाठवली थेट विमानाची तिकिटे
फ्लायओव्हरचा भाग कोसळल्याचा व्हायरल फोटो ना मुंबईचा, ना पुण्याचा, ना बंगळुरूचा... जाणून घ्या सत्य
"...असा पक्ष कोणालाही वाचवता येणार नाही", शिवराज सिंह चौहान यांचा हल्लाबोल
"काँग्रेस अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधींची मुलंही योग्य उमेदवार"