शहरं
Join us  
Trending Stories
1
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
2
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
3
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
4
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
5
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
6
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
7
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
8
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
9
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
10
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
11
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
12
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
13
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
15
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
16
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
17
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
18
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
19
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
20
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?

बड्या मंत्र्यांचा राजीनामा, पण मोदींच्या मंत्रिमंडळातील या सहा चेहऱ्यांचं होऊ शकतं प्रमोशन, हे आहे कारण 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2021 3:32 PM

PM Modi Cabinet Expansion: सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात असलेल्या सहा मंत्र्यांचे प्रमोशन होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच या मंत्र्यांना स्वतंत्र प्रभार किंवा राज्यमंत्रीपदावरून कॅबिनेटमंत्रिपदावर नियुक्ती मिळू शकते.

ठळक मुद्देमंत्रिमंडळ विस्तारापूर्वी आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचा राजीनामा घेण्यात आल्याने आता नव्या मंत्रिमंडळाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे नव्या कॅबिनेटमध्ये ज्या मंत्र्यांना प्रमोशन मिळू शकते त्यांच्यामध्ये अनुराग ठाकूर, जी. किशन रेड्डी, पुरुषोत्तम रुपाला, हरदीप सिंग पुरी, आर.के.सिंह, मनसुख मांडविया यांचे नाव सर्वात पुढे आहेया सर्वांच्या बढतीमागे विविध राज्यांत होणाऱ्या निवडणुका हे महत्त्वाचे कारण आहे

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा विस्तार होणार असल्याने आज राजधानी दिल्लीतील राजकीय वर्दळ वाढली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळातील फेरबदल आणि विस्ताराबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. (PM Modi Cabinet Expansio) दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचा राजीनामा घेण्यात आल्याने आता नव्या मंत्रिमंडळाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे. दरम्यान, सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात असलेल्या सहा मंत्र्यांचे प्रमोशन होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच या मंत्र्यांना स्वतंत्र प्रभार किंवा राज्यमंत्रीपदावरून कॅबिनेटमंत्रिपदावर नियुक्ती मिळू शकते. (Big ministers resign, but these six faces in Modi's cabinet could be promoted)

नरेंद्र मोदींच्या नव्या कॅबिनेटमध्ये ज्या मंत्र्यांना प्रमोशन मिळू शकते त्यांच्यामध्ये अनुराग ठाकूर, जी. किशन रेड्डी, पुरुषोत्तम रुपाला, हरदीप सिंग पुरी, आर.के.सिंह, मनसुख मांडविया यांचे नाव सर्वात पुढे आहे. या सर्वांच्या बढतीमागे विविध राज्यांत होणाऱ्या निवडणुका हे महत्त्वाचे कारण आहे. पुढच्या काळात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, गोवा, हिमाचल प्रदेश आणि पंजाब या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

बढती मिळणाऱ्या नेत्यांच्या यादीत हरदीप सिंग पुरी यांचं नाव आघाडीवर आहे. त्यांच्याकडे सध्या तीन मंत्रालयांचा भार आहे. त्यामध्ये नागरी हवाई वाहतुक मंत्री, शहरी विकास मंत्री आणि वाणिज्य मंत्रालयाचा प्रभार आहे. ते शीख आहेत. तसेच पंजाबमधील विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून त्यांचं प्रमोशन होणार आहे.

या यादीत दुसरं नाव हे अनुराग ठाकूर यांचं. अनुराग ठाकूर हे सध्या वित्तराज्यमंत्री आहेत. मात्र पुढील दीड वर्षांने हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना मंत्रिपदामध्ये बढती मिळू शकते. अनुराग ठाकूर हे हिमाचल प्रदेशमधील खासदार असून, त्यांचे वडील प्रेमकुमार धुमल हे भाजपाचे बडे नेते आहेत. धुमल यांनी तीन वेळा हिमाचलचे मुख्यमंत्रिपद भूषवले आहे.

याशिवाय मनसुख मांडविया, पुरुषोत्तम रुपाला यांनाही बढती मिळण्याची शक्यता आहे. गुजरातमधील हे नेते लेवा पटेल समाजाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांनाही स्वतंत्र प्रभार असलेलं राज्यमंत्रिपद मिळू शकतं. त्याशिवाय ऊर्जा मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार सांभाळत असलेल्या आर.के. सिंह यांनाही कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळू शकते.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाPoliticsराजकारण