नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या संसदीय दलाच्या बैठकीत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. तसेच, कॉंग्रेसवर सभागृह सुरळीत चालू देत नसल्याचा आरोपही केला. याशिवाय, कोविड-19 महामारीवर चर्चा करण्यासाठी बोलवलेल्या बैठकीत स्वतः बहिष्टार टाकून इतर पक्षांनाही बैठकीत येण्यापासून रोखले, असेही मोदींनी सांगितले. यावेळी मोदींनी भाजपा खासदारांना काँग्रेस आणि विरोधकांची कामे जनता आणि मीडियासमोर एक्सपोज करण्यास सांगितले.
दरम्यान, पेगासस हॅकिंग आणि नवीन कृषी कायदे परत घेण्याच्या मागणीवरुन काँग्रेसने घातलेल्या गोंधळामुळे सोमवारी राज्यसभेची कारवाई सहावेळ स्थगित करावी लागली. विरोधकांनी हातात पोस्टर घेऊन दिवसभर संसदेत गोंधळ घातला. विरोधकांनी स्पायवेयर फोन हॅकिंग प्रकरणावर चर्चा करणे आणि याचा तपास करण्यासाठी उच्च स्तरिय समितीकडून चौकशी करणयाची मागणी केली. तसेच, या मगाण्या पूर्ण होईपर्यंत संसदेची कार्यवाही चालू देणार नाहीत, असा इशाराही दिला.
दोन विधेयक मंजूरविरोधकांनी लोकसभेतही प्रचंड गोंधळ घातला. या गोंधळादरम्यान सरकारने सोमवारी दोन विधेयक द फेक्टरिंग रेगुलेशन (अमेंडमेंट) बिल 2021 आणि नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ फूड टेक्नोलॉजी एंटरप्रिन्योरशिप अँड मॅनेजमेंट बिल 2021 मंजूर करुन घेतले. दरम्यान, संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलै रोजी सुरू झाले आहे. पहिल्याच दिवसापासून विरोधक महागाई, कृषी कायदे, पेगासस गुप्तहेरी आणि इतर मुद्यांवर सरकारवर निशाणा साधत आहेत. या गोंधळामुळे एक दिवसही संसदेचे कामकाज पूर्ण होऊ शकले नाही.