मुंबई : राज्यात दहा मतदारसंघात १८ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. दुसºया टप्प्यात एक कोटी ८५ लाख ४६ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात एकूण १७९ उमेदवार असून २० हजार ७१६ मतदान केंद्र आहेत; तर त्यापैकी सुमारे २१०० मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्ट होणार आहे.१५ पेक्षा जास्त उमेदवार असलेले चार मतदार संघ असून यापैकीबीड मतदारसंघात एका कंट्रोल युनिटमागे ३ बॅलेट युनिट, अमरावती, अकोला आणि परभणी मतदारसंघात प्रत्येकी दोन बॅलेट युनिट तर अन्य ६ मतदार संघात प्रत्येकी एक बॅलेट युनिट लागणार आहेत. या निवडणुकीसाठी ६२ हजार ७०० ईव्हीएम (३७ हजार ८५० बॅलेटयुनिट आणि २४ हजार ८५० कंट्रोल युनिट) तर सुमारे २७ हजार व्हीव्हीपॅट यंत्रे देण्यात आली आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज दिली.निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावासाठी सावलीची व्यवस्था, प्रत्येक विधानसभा मतदानकेंद्रात सखी मतदान केंद्र अशी व्यवस्थाकरण्यात आली आहे. सुमारे १०टक्के मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे लाइव्ह वेबकास्ट केलेजाणार असून जिल्हा निवडणूक अधिकारी, राज्यस्तरावर मुख्य निवडणूक अधिकारी आणि भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी, संबंधित मतदार संघांचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक हे लाइव्ह वेबकास्ट पाहतील.>मतदानासाठी ग्राह्य ओळखपत्रेमतदार ओळखपत्र, पासपोर्ट, आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकांचे पासबुक, महसूल निर्मिती निर्देशांकद्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार यांचे ओळखपत्र>मतदारसंघ उमेदवारबीड ३६हिंगोली २८अमरावती २४परभणी १७नांदेड १४मतदारसंघ उमेदवारउस्मानाबाद १४सोलापूर १३बुलडाणा १२अकोला ११लातूर १०
आज २०,७१६ मतदान केंद्रांवर मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 5:08 AM