मुंबई: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी तीन दिवसांपूर्वी वनमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राठोड यांच्यावर अतिशय गंभीर आरोप झाल्यानं त्यांच्या राजीनाम्यासाठी मोठा दबाव होता. त्यातच सोमवारपासून (१ मार्च) अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असल्यानं विधिमंडळात विरोधकांकडून या विषयावरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न होता. त्यामुळेच अधिवेशनाला सुरुवात होण्याच्या एक दिवस आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) राठोड यांचा राजीनामा घेतला.संजय राठोड अद्यापही मंत्रिपदावर; राजीनामा घेऊन शिवसेनेनं केला पॉलिटिकल गेम?मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारला असला तरीही तो अद्याप मुख्यमंत्री कार्यालयाकडेच आहे. राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री कार्यालयानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवलेला नाही. यावरून भाजपनं ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. राठोड यांचा राजीनामा निव्वळ फार्स होता का, असा सवाल भाजप नेत्यांकडून विचारला जात आहे. तर राष्ट्रवादीनं याबद्दल हात झटकले आहेत.5 कोटी घेतल्याचे आरोप भोवले; शांता राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखलसंजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडेच आहे का, तो राज्यपालांना पाठवला गेला नाही का, असे प्रश्न राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (NCP Leader Nawab Malik) यांना विचारण्यात आले. त्यावर 'माझ्याकडे याबद्दलची माहिती नाही. ही माहिती तुम्हाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळेल,' असं उत्तर मलिक यांनी दिलं. त्यामुळे राठोड प्रकरणात शिवसेना एकाकी पडल्याचं चित्र आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीनं या प्रकरणात शिवसेनेचा बचाव केलेला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत.पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला नवं वळण; वडील लहू चव्हाण यांची पोलीस ठाण्यात धाव''राजीनामा फ्रेम करू नका; आरोप फ्रेम करा''संजय राठोड यांचा राजीनामा फ्रेम करायला घेतलेला नाही. तो काही फ्रेम करून ठेवण्यासारखा नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. यावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. 'राजीनामा फ्रेम करू नका. पण राठोड यांच्यावर कायद्याच्या फ्रेमवर्कप्रमाणे गुन्हे फ्रेम करा. ते कोर्टासमोर आणा. अटकेचे आदेश फ्रेम करा,' असा आक्रमक पवित्रा शेलार यांनी घेतला.विरोधी पक्षनेते फडणवीस यांचा हल्लाबोलसंजय राठोड यांच्या राजीनाम्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला की नाही याची मला कल्पना नाही. बहुधा त्यांनी तो राजीनामा पाठवलेला नाही. कदाचित राजीनामा फ्रेम करायला ठेवला असेल. असं करून तुम्ही तुमच्या नेत्याला, मंत्र्याला वाचवू शकाल. पण तुम्हाला रात्रीची झोप येणार नाही, असं फडणवीस म्हणाले.
Pooja Chavan Death Case: आमच्याकडे माहिती नाही, सीएमओला विचारा; राष्ट्रवादीनं हात झटकल्यानं शिवसेना एकाकी?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 1:44 PM