मुंबई - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून आक्रमक झालेल्या भाजपाला शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टोला लगावला आहे. (Pooja Chavan Case) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे न्यायप्रिय आहेत, मिस्टर सत्यवादी आहेत, ते संजय राठोड प्रकरणात न्याय करणारच, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. (Sanjay Raut Says, "Maharashtra Chief Minister is Mr. Satyavadi, he will do justice" )
संजय राठोड प्रकरणात भाजपाने घेतलेली आक्रमक भूमिका आणि विधिमंडळाचे अधिवेशन चालवू न देण्याच्या दिलेल्या इशाऱ्याबाबत संजय राऊत म्हणाले की, आपण जेव्हा काही भूमिका घेतो, आक्रमक, प्रखर. तेव्हा मोदी असतील, गृहमंत्री अमित शाहा असतील तेव्हा काही भूमिका असते. अधिवेशन व्हायला पाहिजे असे आम्हाला वाटते. अधिवेशन झाले पाहिजे. त्यामधून प्रश्न मांडले गेले पाहिजेत. अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, कोविड संदर्भात, विरोधकांना जे प्रश्न उपस्थित करायचे आहेत, तेही करू शकतात. पण अधिवेश होऊ द्या, गोंधळ नको. पण अधिवेशन होऊच द्यायचं नाही. यातील च हा लोकशाही विरोधी आहे, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
यावेळी भाजपाच्या महिला आघाडीकडून पूजा चव्हाण प्रकरणात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देताना राठोड म्हणाले की, पंतप्रधानांनी सांगितलं की आंदोलन करायचं नाही. मात्र महाराष्ट्रापर्यंत हा संदेश पोहोचलेला दिसत नाही. विरोधी पक्षाला आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहेत. पण प्रत्येकाने आपल्या मर्यादा पाळल्या पाहिजेत. भाजपावाले ज्या विषयासंदर्भात ते आंदोलन करू इच्छितात त्या विषयात मला खात्री आहे की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे न्यायप्रिय आहेत, मिस्टर सत्यवादी आहेत. ते या प्रकरणात नक्कीच न्याय करतील, असा विश्वास आहे, असे संजय राऊत म्हणाले.