पूजा चव्हाणच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणानंतर गेले पंधरा दिवस माध्यमांपासून दूर असलेले राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मंगळवारी २३ फेब्रुवारीला पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या पुढे आले. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे सहपरिवार दर्शन घेणे व त्यानंतर यवतमाळात कोरोनाची आढावा बैठक घेणे असा त्याचा मंगळवारचा अधिकृत कार्यक्रम होता. दरम्यान यावरून आता भाजपनं त्यांच्यावर निशाणा साधला आहे."पोहरादेवीची ‘पूजा’ तरी कशी पावेल, जर चव्हाणांच्या पूजाचं काय झाल ते सांगितलं नाहीत तर?," असं म्हणत भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून संजय राठोड यांच्यावर टीका केली. "युवतीच्या मृत्यूप्रकरणात नाव असलेले मंत्री १५ दिवस गायब होतात. मुख्यमंत्री गप्प. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाला हरताळ फासत हे मंत्री सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत शक्ती प्रदर्शन करतात. सत्तेची अपरिहार्यता असू शकेल, मुख्यमंत्री किमान कोरोनाचे नियम मोडल्याचा गुन्हा दाखल तरी करणार का ?," असा सवालही त्यांनी केला.
"पोहरादेवीची ‘पूजा’ तरी कशी पावेल, जर चव्हाणांच्या पूजाचं काय झाल ते सांगितलं नाहीत तर?"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 12:35 PM
pooja chavan suicide : भाजपची संजय राठोड यांच्यावर टीका
ठळक मुद्देपोहरादेवीची ‘पूजा’ तरी कशी पावेल,असं म्हणत भाजपची संजय राठोडांवर टीकासोमवारी चित्रा वाघ यांनीही पोलिसांना सोपवलं होतं निवेदन