मुंबई – पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्या(Pooja Chavan Suicide Case) प्रकरणाने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेना मंत्री संजय राठोड(Sanjay Rathod) यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपाने वारंवार लावून धरली आहे, यातच १५ दिवस गायब असलेले मंत्री राठोड यांनी पोहरादेवी गडावर शक्तीप्रदर्शन करत त्यांच्यावरील आरोपाचं स्पष्टीकरण दिलं.(BJP Nilesh Rane Target CM Uddhav Thackeray over Sanjay Rathod allegation in Pooja Chavan Suicide Case)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढत असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, शिस्त पाळावी, गर्दी करू नये असं आवाहन केले होते, मात्र त्याचनंतर शिवसेना मंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत हजारोंच्या संख्येने शक्तीप्रदर्शन केले, यावरून भाजपा सचिव निलेश राणेंनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. निलेश राणे म्हंटले की, ठाकरे सरकार संजय राठोडला वातवतंय, सगळ्या बाजूने अडकलेला संजय राठोड शक्तीप्रदर्शन करतो, कॅबिनेट मिटिंगमध्ये बसतो, पण तरीही राजीनामा घेण्याची हिंमत आणि धाडस मुख्यमंत्र्यांमध्ये नाही, परत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कधीही स्वत:च्या भाषणात मी मर्द आहे असं म्हणू नये असा टोला त्यांनी लगावला आहे.
तसेच पूजा चव्हाण प्रकरणात चित्रा वाघ या वानवडी पोलीस स्टेशनला जाब विचारण्यासाठी गेल्या होत्या, पोलिसांनी त्यांना दिलेली वागणूक बघून आश्चर्य वाटले, एक गुन्हेगार मंत्र्याला वाचवण्यासाठी पोलीस किती तत्पर आहेत यावरून लक्षात आलं अशा शब्दात निलेश राणेंनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची परीक्षा
आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या(CM Uddhav Thackeray) निर्णय क्षमतेची परीक्षा आहे, मुख्यमंत्री म्हणून आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना अभय द्यायचा की, या महाराष्ट्रात पक्षाबद्दल, लोकशाहीविषयी लोकांमध्ये विश्वास निर्माण करायचा. हा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
संजय राठोडांवर राजीनाम्याची टांगती तलवार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रचंड नाराज?
मी गायब नव्हतो, बदनामी थांबवा
मी गायब नव्हतो, तर आई-वडील म्हातारे असल्यामुळे त्यांना व पत्नीला धीर देण्यासाठी बंगल्यावर होतो. आता पोहरादेवीचे दर्शन करून पूर्ववत कामाला लागणार आहे. मागासवर्गीयांचा नेता असल्यामुळे माझ्यावर घाणेरडे आरोप करून माझे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे राजकारण केले जात आहे. माझी व समाजाची बदनामी थांबवा असं आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केले.