शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

Pooja Chavan Suicide Case : "केवळ राजीनामा पुरेसा नाही, संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करा"

By बाळकृष्ण परब | Published: February 16, 2021 12:17 PM

Pooja Chavan Suicide Case, BJP Demands Sanjay Rathod arrest : पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर गेल्या आठवडभरापासून गायब असलेल्या संजय राठोड यांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवल्याचे सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी पाठवलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी मंजुरीसाठी ताबडतोब राज्यपालांकडे पाठवावा संजय राठोड यांचा राजीनामा पुरेसा नाहीसंजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी

मुंबई - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आरोप होत असलेले राज्य सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी आज अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे पाठवल्याचे वृत्त आहे. (Pooja Chavan Suicide Case) पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर गेल्या आठवडभरापासून गायब असलेल्या संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर आता संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमक झालेल्या भाजपाने अधिकच आक्रमक भूमिका घेतली आहे. (BJP leader Atul Bhatkhalkar Demands Sanjay Rathod arrest )पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण उघडकीस आल्यापासून भाजपाने आक्रमक भूमिका घेत संजय राठोड आणि शिवसेनेला खिंडीत गाठले होते. दरम्यान, विरोधक तसेच इतर माध्यमातून वाढत असलेल्या दबावामुळे आज संजय राठोड यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया देताना केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांनी पाठवलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी मंजुरीसाठी ताबडतोब राज्यपालांकडे पाठवावा. तसेच केवळ संजय राठोड यांचा राजीनामा पुरेसा नाही. तर संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी.वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, संजय राठोड यांचा राजीनाम्याबाबत सोमवारपासून विविध चर्चा सुरू होत्या. दरम्यान, या प्रकरणाच्या निष्पक्षपाती चौकशीसाठी संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आता संजय राठोड हे येत्या गुरुवारी माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडणार असल्याचं कळतंय, वाशिम जिल्ह्यात पोहरा देवी हे गाव आहे. या ठिकाणी बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराजांचे मोठे मंदिर आहे. बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि महंत याच मंदिरात असतात. गुरुवारी या मंदिरात येऊनच धर्मगुरूंच्या साक्षीने संजय राठोड आपली बाजू मांडणार असल्याचं सांगण्यात येत आहे.कोण आहे पूजा चव्हाण?पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती, परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. विलास व अरुण यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला.

टॅग्स :Pooja Chavanपूजा चव्हाणSanjay Rathodसंजय राठोडAtul Bhatkalkarअतुल भातखळकरPoliticsराजकारण