शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

Pooja Chavan : मंत्र्यावरील आरोपांमुळे शिवसेना गंभीर, संजय राठोड यांना दिला मोठा आदेश

By बाळकृष्ण परब | Published: February 13, 2021 1:46 PM

Shiv Sena gives order to Sanjay Rathore after allegations in Pooja Chavan Suicide Case : पूजा चव्हाण या तरुणीने केलेल्या आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर येत असल्याने राज्यातील सत्ताधारी शिवसेनेची कोंडी झाली आहे.

ठळक मुद्देहोत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मंत्री संजय राठोड यांना सक्त आदेश देण्यात आले आहेप्रसारमाध्यमांशी बोलू नका, असे आदेश शिवसेनेकडून राठो़ड यांना देण्यात आले आहेराठोड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधल्यास अडचणीत अधिकच वाढ होऊ शकते, अशी शक्यता असल्याने निर्णय

मुंबई - पूजा चव्हाण या तरुणीने केलेल्या आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर येत असल्याने राज्यातील सत्ताधारी शिवसेनेची कोंडी झाली आहे. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून हे प्रकरण सातत्याने लावून धरण्यात येत असल्याने महाविकास आघाडी सरकारसमोरील अडचण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांना सक्त आदेश दिले आहेत. (Pooja Chavan Suicide Case)या प्रकरणी विरोधी पक्षाकडून तसेच सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमधून होत असलेल्या आरोपांबाबत संजय राठोड यांची थेट प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मंत्री संजय राठोड यांना सक्त आदेश देण्यात आले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलू नका, असे आदेश शिवसेनेकडून राठो़ड यांना देण्यात आले आहेत. राठोड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधल्यास अडचणीत अधिकच वाढ होऊ शकते, अशी शक्यता असल्याने संजय राठोड यांना अशी सूचना करण्यात आली आहे.गेल्या पाच-सहा महिन्यांत नाजूक प्रकरणांवरून महाविकास आघाडी सरकारवर आरोप होण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी दिशा सालियनची आत्महत्या, तसेच धनंजय मुंडेंवर झालेला बलात्काराचा आरोप यामुळे सरकार अडचणीत सापडले होते. हे वाद निवळण्याची चिन्हे दिसत असतानाच पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येचे प्रकरण समोर आल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी अधिकच वाढली आहे.

पुण्यामधील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या पूजा चव्हाण या तरुणीने रविवारी ७ फेब्रुवारी रोजी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावरून उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली होती. त्यानंतर या प्रकरणात महाविकासआघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री असलेले संजय राठोड यांचे नाव समोर आले होते. संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे.पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती, परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंग होती, १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडPooja Chavanपूजा चव्हाणShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण