मुंबई - गेल्या आठवड्यात पूजा चव्हाण (Pooja Chavan) या तरुणीने पुण्यात केलेल्या आत्महत्येवरून शिवसेना (Shiv Sena) नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) हे चांगलेच अडचणीत आले आहेत. या प्रकरणात आरोप झाल्यापासून संजय राठोड हे बेपत्ता असून, राजीनाम्यासाठी दबाव वाढत असल्याने ते गुरुवारी राजीनामा देण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. (Pooja Chavan suicide case)पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येची घटना समोर आल्यानंतर या प्रकरणाविषयी सोशल मीडियावर दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून या प्रकरणावर संजय राठोड यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला. दरम्यान, हे आरोप सुरू झाल्यापासून संजय राठोड हे थेटपणे समोर आलेले नाहीत. मात्र विरोधकांकडून तसेच पक्षामधील एका गटाकडूनही दबाव वाढल्याने आता संजय राठोड हे मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. संजय राठोड हे गुरुवारी पोहरादेवी येथून राजीनाम्याची घोषणा करणार असल्याची शक्यता आहे.दरम्यान, संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरून विरोधक आक्रमक झालेले असतानाच शिवसेनेमधील एक गटही त्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहे. पक्ष किंवा सरकार अडचणीत येत असेल तर राजीनामा घेऊन ठेवावा असाही एक मतप्रवाह पक्षात पाहायला मिळत आहे. संजय राठोड यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात दबाव आहे. बंजारा सामाजाची आणि पूजा चव्हाणच्या कुटुंबियांनी संजय राठोड यांना क्लिन चीट दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील द्वीधा मनःस्थितीत असल्याचे दिसून येत आहे.दुसरीकडे शिवसेनेचा एक बडा नेता आणि कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच धनंजय मुंडे प्रकरणात त्यांच्याकडून राजीनामा घेतला नाही तर मग संजय राठोड यांना तरी राजीनामा द्यायला का लावायचं, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. शिवाय असं झालं तर वेगवेगळ्या मुद्यांवर विरोधक राजीनामे मागत सुटतील असा शिवसेनेते एक मतप्रवाह आहे. ऑडिओ क्लिपमधील आवाज पूजा चव्हाणचा नाहीपूजाच्या आत्महत्येसंदर्भात ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. त्यातील आवाज पूजाचा नाही. पूजाच्या मृत्यूप्रकरणी आपली कोणाविरोधातही तक्रार नाही, कुणाविषयी शंका नाही. त्यामुळे आमची आणि समाजाची बदनामी करून आम्हाला वेदना देऊ नका, अशी विनंती लहू चव्हाण यांनी केली आहे. या प्रकरणात ज्यांचे नाव जोडले जात आहे, ते मंत्री संजय राठोड हे पूजाच्या वडिलांसारखे आहेत, असे लहू चव्हाण ह्यलोकमतह्णशी बोलताना म्हणाले आहेत.मोबाईल, लॅपटॉपमध्ये अनेक आक्षेपार्ह गोष्टीआत्महत्या केलेल्या मुलीच्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह माहिती सापडली आहे. पोलिसांनी तिचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला आहे. त्यामध्ये काय आहे हे पोलिसांनी जाहीर करावे, नाहीतर दोन-तीन दिवसांत याची माहिती बाहेर येईलच, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.कोण आहे पूजा चव्हाण?पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती, परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. विलास व अरुण यांनी तिला तातडीने उपचारासा
Pooja Chavan suicide Case : संजय राठोड यांचा पाय आणखी खोलात; मंत्रिपदाचा राजीनामा देणार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 8:27 AM
Pooja Chavan suicide case, Shiv Sena leader Sanjay Rathore in trouble : पूजा चव्हाण या तरुणीने केलेल्या आत्महत्येवरून शिवसेना नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड हे चांगलेच अडचणीत आले आहेत.
ठळक मुद्देसंजय राठोड हे मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चासंजय राठोड हे गुरुवारी पोहरादेवी येथून राजीनाम्याची घोषणा करणार असल्याची शक्यता आरोप सुरू झाल्यापासून संजय राठोड हे थेटपणे समोर आलेले नाहीत