मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्या(Pooja Chavan Suicide Case) प्रकरणावरून विरोधकांनी ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना मंत्री संजय राठोड(Shivsena Sanjay Rathod) यांचे या प्रकरणात नाव गोवल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली, राठोडांवर आरोप होताना ते १५ दिवस गायब झाले, परंतु अचानक मंगळवारी संजय राठोड यांनी शक्तीप्रदर्शन करत त्यांच्यावरील आरोपांवर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.(BJP Sudhir Mungantiwar Target CM Uddhav Thackeray over Sanjay Rathod trouble in Pooja Chavan Suicide Case)
संजय राठोडांवर आधी आरोप आणि नंतर शक्तीप्रदर्शन केल्यामुळे विरोधी पक्ष भाजपाला(BJP) सरकारची कोंडी करण्यासाठी आयती संधी सापडली, याबाबत माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) म्हणाले की, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या(CM Uddhav Thackeray) निर्णय क्षमतेची परीक्षा आहे, मुख्यमंत्री म्हणून आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना अभय द्यायचा की, या महाराष्ट्रात पक्षाबद्दल, लोकशाहीविषयी लोकांमध्ये विश्वास निर्माण करायचा. हा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे असं त्यांनी सांगितले.
संजय राठोडांवर राजीनाम्याची टांगती तलवार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रचंड नाराज?
त्याचसोबत संशयाची सुई आपल्या एका मंत्र्यावर आहे, ही संशयाची सुई दूर होईपर्यंत त्या मंत्र्याला पदावरून दूर करायचं का हे मुख्यमंत्र्यांना ठरवायचं आहे, मुख्यमंत्री महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यात सक्षम आहेत की, नाही हे या प्रकरणावरून दिसतंय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ४८ तासांपूर्वी कोरोना रुग्ण वाढतायेत, सर्वांनी आपापली जबाबदारी घेतली पाहिजे असं आवाहन करतात, आणि त्यांच्या आदेशाच्या झुगारून शक्तीप्रदर्शन केले जाते, खुलेआम अपमानाचं प्रदर्शन शिवसेनेचाच(Shivsena) मंत्रीच करतो, मग सामान्य जनतेकडून काय अपेक्षा करणार आहे असा टोला मुनगंटीवारांनी शिवसेनेला लगावला आहे.
दरम्यान, अजित पवारांनीही स्वत: आरोपानंतर राजीनामा दिला होता, मंत्रिपदावरून जाणं म्हणजे कायमचं जाणं होत नाही, चौकशी अहवालातून जे काही सत्य येईल त्यानंतर मंत्रिपद पुन्हा मिळू शकतं, राजकीय पक्ष वाईट लोकांचा समूह आहे ही व्याख्या लोकांच्या मनात निर्माण होतेय, ज्यादिवशी ही घटना झाली, त्यानंतर ऑडिओ क्लीप, फोटो व्हायरल होत आहेत, यामध्ये निश्चिच कुठेतरी पाणी मुरतंय हे कोणीही लहान मुलगाही सांगेल असं सांगत सुधीर मुनगंटीवारांनी शरद पवारांनी शक्तीप्रदर्शनावर नाराजी व्यक्त केली हे योग्यच आहे असंही त्यांनी सांगितले.
मी गायब नव्हतो, बदनामी थांबवा
मी गायब नव्हतो, तर आई-वडील म्हातारे असल्यामुळे त्यांना व पत्नीला धीर देण्यासाठी बंगल्यावर होतो. आता पोहरादेवीचे दर्शन करून पूर्ववत कामाला लागणार आहे. मागासवर्गीयांचा नेता असल्यामुळे माझ्यावर घाणेरडे आरोप करून माझे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे राजकारण केले जात आहे. माझी व समाजाची बदनामी थांबवा असं आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केले