शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

विधानसभेत पटनायकच जिंकण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 4:22 AM

मोदींच्या नेतृत्वाखाली २0१४ साली देशाच्या अनेक भागांत चांगला विजय मिळवल्यानंतर भाजप यंदा ओडिशात जम बसविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : मोदींच्या नेतृत्वाखाली २0१४ साली देशाच्या अनेक भागांत चांगला विजय मिळवल्यानंतर भाजप यंदा ओडिशात जम बसविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. चारवेळा सहज बाजी मारणारे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासाठी यंदाची लोकसभा निवडणूक म्हणावी तेवढी सोपी नाही. लोकसभेच्या २१ आणि विधानसभेच्या १४७ जागांसाठी पहिल्या चार टप्प्यांत निवडणुका होत असून, पहिल्यांदाच बीजेडी-भाजप यांच्यात १९ जागी लढत आहे.विधानसभा निवडणुकीसाठी मात्र वेगळी स्थिती दिसते. बिजदचे खा. तथागत सत्पथी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, लोकसभेसाठी भाजपचा फायदा होऊ शकेल. पण विधानसभा निवडणुकांत नवीन पटनायकच यांचाच विजय होईल. ओडिशातील जनता यावेळी लोकसभा आणि विधानसभेसाठी वेगवेगळा कौल देऊ शकेल.सत्पथी हे वैयक्तिक कारणांनी यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले नाहीत; परंतु ते पक्षातच आहेत. लोकसभेचे वारे भाजपच्या दिशेने वाहत असल्याचे त्यांना वाटत आहे.व्ही.पी. सिंह आणि मनमोहन सिंग यांच्या सरकारमधील माजी केंद्रीय मंत्री श्रीकांत जेना यांचेही असेच मत आहे. त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला असला तरी ते कोणत्याही पक्षात सामील झालेले नाहीत. त्यांनी सांगितले की, नोटाबंदी, जीएसटी व महत्त्वाच्या धोरणात्मक मुद्द्यांवर नवीन पटनायक यांनी संसदेत मोदी सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नवीन पटनायक यांच्याऐवजी मोदी यांनाच का मते देऊ नयेत, असे लोकांचे म्हणणे आहे.भाजपला २०१४ मध्ये सुंदरगढचीच जागा जिंकता आली. नऊ ठिकाणी भाजप दुसऱ्या व अन्य ठिकाणी तिसºया क्रमांकावर होता. विधानसभेतही नऊच जागा मिळाल्या होत्या. यावेळी ओडिशात अधिक जागा मिळविण्याचा भाजपचा मनुसबा आहे.ओडिशात भाजप सदस्यांची संख्या ३ लाखांवरून ३६ लाखांवर गेली आहे.२०१७ मध्ये पंचायत निवडणुकीतही भाजपची स्थिती सुधारली होती, असे भाजपचे ओडिशाचे प्रभारी अरुण सिंह यांनी सांगितले. भाजपने ओडिशात राष्टÑीय कार्यकारिणीची बैठक घेतली होती.>शेवटची निवडणूक?भाजपच्या सूत्रांनी सांगितले की, केओंझार, मयूरभंज, संभलपूर, बारगढ, धेनुकनाल, कंधामाल, फुलबनी, कालाहंडी बोलांगिर व अन्य तीन ठिकाणी भाजप चुरशीची लढत देत आहे. तथापि, पटनायक यांची शेवटची निवडणूक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पटनायक यांना कडवी लढत देण्याची भाजपची इच्छा नाही.

टॅग्स :Odisha Lok Sabha Election 2019ओडिशा लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपा