प्रशांत किशोर बनणार काँग्रेसचे चाणक्य? राजकारणातील प्रवेशाबाबत केलं मोठं विधान 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 11:38 AM2021-07-27T11:38:38+5:302021-07-27T11:39:13+5:30

Prashant Kishor News: राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र प्रशांत किशोर यांनी आता राजकारणातील प्रवेशाबाबत मोठं विधान केलं आहे

Prashant Kishor to become Congress's Chanakya? Made a big statement about entering politics | प्रशांत किशोर बनणार काँग्रेसचे चाणक्य? राजकारणातील प्रवेशाबाबत केलं मोठं विधान 

प्रशांत किशोर बनणार काँग्रेसचे चाणक्य? राजकारणातील प्रवेशाबाबत केलं मोठं विधान 

Next

नवी दिल्ली - २०२२ मध्ये होणाऱ्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेली सात वर्षे देशातील सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसने या निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. (Prashant Kishor) यादरम्यान, राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र प्रशांत किशोर यांनी आता राजकारणातील प्रवेशाबाबत मोठं विधान करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. (Prashant Kishor to become Congress's Chanakya? Made a big statement about entering politics)

प्रशांत किशोर यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत मी कुठल्याही राजकीय घडामोडींचा भाग नाही आहे. तसेच २०२२ मध्ये होणाऱ्या पाच राज्यांमधील निवडणुकीतही माझी कुठलीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भूमिका नसेल, असेही प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले. मात्र प्रशांत किशोर यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाबाबत काँग्रेसनेही कुठलेही विधान केलेले नाही. तसेच ही बाब फेटाळूनही लावलेली नाही.

प्रशांत किशोर यांनी सांगितले की, सध्याचा पंजाबमधील विषय असो वा कुठली अन्य विषय असो. काँग्रेसच्या कुठल्याही निर्णयामध्ये माझा कुठलाही सहभाग नव्हता. तसेच बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर मी सक्रिय राजकारणातून बाजूला होण्याचा जो निर्णय घेतला होता. त्यावर मी अजूनही कायम आहे. राजकारणातील प्रवेशाबाबत मी काही निर्णय घेतला तर त्याबाबत मी सार्वजनिक मंचावरून घोषणा करेन. मात्र सक्रिय राजकारणामध्ये काम सुरू ठेवायचे की नाही, याबाबत मी अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असेही प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, प्रशांत किशोर यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाबाबत पक्षातील सूत्रांनी सांगितले की, या प्रकरणी कुठलाही निर्णय हा काँग्रेस नेतृत्व आणि प्रशांत किशोर यांनी एकत्र येऊन घेतला पाहिजे. मात्र काँग्रेस याबाबत अनौपचारिकपणे चर्चा करत आहे. सध्या काँग्रेस पंजाब आणि राजस्थानमधील घडामोडींबाबत चिंतीत आहे. पक्षश्रेष्ठींनी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पंजाबमध्ये राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे नवज्योतसिंग सिद्धूकडे सोपवली आहेत. तर राजस्थानमध्येही पक्षात मोठे फेरबदल होणार आहेत.  

Web Title: Prashant Kishor to become Congress's Chanakya? Made a big statement about entering politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.