शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई महापालिकेत भाजपा-मनसे युती होणार?; प्रविण दरेकरांच्या विधानानं उत्सुकता लागली

By प्रविण मरगळे | Published: November 19, 2020 1:18 PM

BJP-MNS, BMC Election News: या निवडणुकीत भाजपा मनसे युती होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांना विचारला होता.

ठळक मुद्देमुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून रणनीती आखण्यासाठी बैठक आयोजित केली होतीआगामी महापालिकेत भाजपाचा भगवा झेंडा फडकेल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला होतामुंबई महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपा मनसेची साथ घेणार

पुणे – पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात इच्छुक नाराज असल्याचं सांगितलं जात होतं, परंतु विभाग प्रभाग विचार करू नये, विभाग वादाला बळी पडायचं कारण नाही. अजिबात नाराजी नाही, इच्छुक प्रत्येक पक्षात असतात. तो विषय संपलेला आहे असा खुलासा विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. भाजपाने सांगलीतील संग्राम देशमुख यांना पुणे पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे. त्यावरुन पुण्यातील भाजपा इच्छुक नेते नाराज असल्याचं बोललं जात होतं.

याबाबत प्रविण दरेकर म्हणाले की, मेधाताई कुलकर्णी आणि आम्ही बघू. त्या प्रचारात फिरत आहेत. पक्षाला मेधाताई नवीन नाहीत, त्यांना पक्ष नाही. मुरलीधर मोहोळ, मेधा कुलकर्णी आणि राजेश पांडे असं कोणीही नाराज नाही असं ते म्हणाले. तसेच मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार भांभावलेलं आहे. शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. शिक्षणमंत्री वेगळं बोलतोय, राज्यमंत्री वेगळं बोलतोय. तीन पक्षाच सरकार असल्याने कोणाचा कोणाला ताळमेळ नाही असं दरेकरांनी सांगितले.

मुंबई महापालिकेत मनसेसोबत युती करणार?

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून रणनीती आखण्यासाठी बैठक आयोजित केली होती, या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, आगामी महापालिकेत भाजपाचा भगवा झेंडा फडकेल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला होता, या निवडणुकीत भाजपा मनसे युती होणार का? या प्रश्नावर उत्तर देताना प्रविण दरेकरांनी सांगितले की, आजतरी भाजपा स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे. पण निवडणुकीच्या वेळी निर्णय घेऊ असं सांगत त्यांनी आगामी काळात मनसे-भाजपा युती होईल का? याची उत्सुकता कायम ठेवली आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

देवेंद्र फडणवीस राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांसमोर अशी विधाने करु शकतात, भाजपाला वाटत असेल आता जो छत्रपतींचा भगवा फडकत आहे तो शुद्ध नाही आणि ते जे कोणता भगवा फडकवणार असेल तो शुद्ध आहे याचा निर्णय जनता ठरवेल, मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यासाठी राज्यात १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिलं आहे. जेव्हा जेव्हा दिल्लीकडून मुंबईची कुंचबणा झाली आहे तेव्हा तेव्हा मराठी माणूस रस्त्यावर उतरला आहे, त्यात शिवसैनिक आघाडीवर आहे. हा इतिहास भाजपाने चाळला पाहिजे, या लोकांना मुंबई महाराष्ट्रात ठेवायची नाही. मुंबईत येणाऱ्या उद्योगपतींना हुसकावून त्यांच्या राज्यात नेतात, मुंबईचं महत्त्व कमी करतायेत त्यावर भाजपा नेते बोलत नाही, मुंबई ओरबडायची असेल तर त्याला आमचा विरोध आहे, १०० पिढ्या आल्या तरी मुंबई महापालिकेवर भगवा उतरवायचं सोडा पण हात लावण्याचीही हिंमत नाही नाही, कारण या भगव्यात आग आहे असं संजय राऊत म्हणाले होते.

 

 

टॅग्स :MNSमनसेBJPभाजपाShiv Senaशिवसेनाpravin darekarप्रवीण दरेकरMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाElectionनिवडणूक