शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

"एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तात्त्पुरती ठिगळं नको; विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना मदत करा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 16:36 IST

Pravin Darekar : कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरु होईपर्यंत, विनाअनुदानित शाळेतील सुमारे 50 हजार शिक्षकांच्या कुटुंबांना तातडीने मदत करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा गेल्या दीड वर्षापासून बंद आहेत. त्यामुळे विनाअनुदानित शाळांमधीलशिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. फक्त शिक्षकच नाही तर त्यांचे कुटुंबीयही या संकटातून जात आहेत. कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरु होईपर्यंत, विनाअनुदानित शाळेतील सुमारे 50 हजार शिक्षकांच्या कुटुंबांना तातडीने मदत करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. (Pravin Darekar’s latter to CM Uddhav Thackeray, said help families of teachers in non granted schools)

प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भातील पत्र आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. या पत्रात कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा सुरू होईपर्यंत विनाअनुदानित शाळेतील सुमारे 50 हजार शिक्षकांच्या कुटुंबांना तातडीने मदत करण्यात यावी, असे म्हटले आहे. हे पत्र प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री कार्यालय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. शाळा बंद असल्याने विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांची परिस्थिती विदारक असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील शिक्षकांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे, असे सांगत प्रवीण दरेकर यांनी यासंबंधी आणखी काही मुद्दे पत्रात मांडले आहे.

'एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तात्त्पुरती ठिगळं नको'याचबरोबर, प्रवीण दरेकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरही भाष्य केले आहे. तात्पुरती ठिगळं लावून एसटीचे कर्मचारी सुखी होणार नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करायला हव्यात. कर्मचारी आजही उपासमारीत जगत आहेत. मुख्यमंत्र्यांनीच कायमस्वरूपी मार्ग काढायला हवा. तर अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांची भेट!प्रवीण दरेकर हे 17 जुलै रोजी औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी विनाअनुदानित शाळांवरील शिक्षकांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. यानंतर ते म्हणाले, "कोरोनामुळे शाळा बंद असल्याने उपजिविका भागवण्यासाठी औरंगाबाद येथील एका शिक्षकाने शिक्षकी पेशा बाजूला ठेऊन दुकानांवर जाऊन चिकटटेप विकणे स्वीकारले. तसेच पैठण तालुक्यातील रांजणगाव येथील शिक्षकाने गावाकडे जाऊन शेती केली, या शिक्षकांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या."

याचबरोबर, राज्य सरकार विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या अवस्थेकडे गंभीरपणे पाहत नाही. त्यामुळे या प्रश्नावर आवाज उठविणार आहे. अशा शाळांमधील शिक्षकांना तात्काळ आर्थिक मदत देण्याचा आग्रह राज्य सरकारकडे करणार आहे, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :pravin darekarप्रवीण दरेकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेSchoolशाळाTeacherशिक्षकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस