कन्नूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील समाजात फूट पाडली आणि समाजातील विविध घटकांमध्ये भांडणे लावून दिली, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. देशामधील वाढती बेकारी, शेतकरी करत असलेल्या आत्महत्या आदी गंभीर समस्यांना मोदीच जबाबदार आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.ते म्हणाले की, मोदींच्या कारभारामुळे रोज देशातील २७ हजार युवक बेकार होत आहेत. कृषी क्षेत्राची पुरती वाट लागली आहे. राफेल विमाने खरेदी व्यवहाराच्या निमित्ताने मोदी यांनी स्वत:चा उद्योगपती मित्र अनिल अंबानी यांना ३० हजार कोटी रुपये दिले. हे एकप्रकारे देशद्रोही वर्तनच आहे. या गैरकृत्यांबद्दल मोदींनी स्पष्टीकरण द्यायला हवे. आर्थिक मागासलेपण, शेतीच्या समस्या तसेच भ्रष्टाचार या तीन मुद्द्यांबद्दल देशात सर्वंकष चर्चा झाली पाहिजे. पण मोदी यांनी आजवर एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही.
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात फूट पाडली'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 04:44 IST