नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशाला मोठा तडाखा बसल्याचे पाहायला मिळाले. दुसरी लाट अद्याप ओसरली नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर राज्यांना निर्बंध लावण्याबाबतचे निर्देश केंद्राकडून देण्यात आले आहे. यातच कोरोना नियंत्रणाबाबत केंद्रातील मोदी सरकारकडून उत्तर प्रदेशचे कौतुक करण्यात आले. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, काँग्रेसने योगी सरकारवर निशाणा साधला आहे. PM मोदींनी सर्टिफिकेट दिले म्हणून योगी सरकारचे अपयश लपू शकत नाही, अशी टीका करण्यात आली आहे. (priyanka gandhi says pm modi certificate cannot hide yogi govt mismanagement in corona situation)
जगण्याचा अधिकार सर्वांत महत्त्वाचा; कावड यात्रेवरुन सुप्रीम कोर्टाने योगी सरकारला फटकारले
पंतप्रधान मोदी यांनी कोरोना नियंत्रणाबद्दल योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे. कोरोनाशी सामना करण्यासाठीचे उत्तर प्रदेश सरकारचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत. काशीतील माझ्या सहकाऱ्यांचे, शासन- प्रशासनाचे, कोरोना योद्ध्यांच्या संपूर्ण गटाचे विशेष आभार मानतो. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक संकटे आली. कोरोना विषाणूच्या बदलणाऱ्या आणि अधिक घातक रुपाने संपूर्ण ताकदीने आपल्यावर हल्ला चढवला. मात्र, काशीसह संपूर्ण उत्तर प्रदेशने या संकटाशी खंबीरपणे लढा दिला, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते. यानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी टीका केली आहे.
योगी सरकारच्या महसुलात ७४ टक्के वाढ; दारू विक्रीतून कमावले तब्बल ३० हजार कोटी!
योगी सरकारचे अपयश लपू शकत नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्टिफिकेट दिले म्हणून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करत असताना योगी सरकारचे क्रौर्य, दुर्लक्ष आणि अव्यवस्था ही लपून राहत नाही. नागरिकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. असहाय्यपणे अडचणींचा सामना करावा लागला. मोदी आणि योगी हे सत्य विसरले असले, तरी ज्यांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भोगावा लागणारा त्रास सहन केला आहे, ते कधीच विसरू शकणार नाही, असे प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, वाराणसीच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी, माफिया राज आणि बोकाळत सुटलेल्या दहशतवाद, यांना आता कायद्याचा चाप बसला आहे. उत्तर प्रदेशात आता कायद्याचे राज्य आहे. गुन्हेगारांना समजले आहे की, ते कायद्यातून वाचू शकणार नाहीत. उत्तर प्रदेश सरकार आज भ्रष्टाचार आणि घराणेशाहीपासून मुक्त आहे. यूपी सरकार विकासवादावर चालत आहे. आता येथे जनतेच्या योजनांचा फायदा थेट जनतेला मिळत आहे, असे म्हटले होते.