- अजित मांडकेठाणे-लोकसभा निवडणुकीची धामधूम आता जोरात सुरु झाली आहे. उन्हाची तमा न बाळगता, सकाळ, सांयकाळी आणि रात्रीच्या सुमारास उमेदवार प्रचार करीत आहेत. दोन प्रमुख पक्षांमध्ये प्रचारात आघाडी घेण्याची स्पर्धा सुरु आहे. मागील काही दिवस वैरभाव मनात घेऊन बसलेले मित्रपक्षही आता जोमाने कामाला लागल्याने रंगत वाढू लागली आहे. निवडणुकीचा प्रचार सोशल मीडिया, प्रचार रॅली, चौक सभा, पदाधिकाऱ्यांच्या बैठका असा वेगवेगळ््या पातळ््यांवर सुरु आहे. ठाण्याने नेहमीच शिवसेनेला साथ दिली असली तरी या पक्षाच्या नेत्यांना गाफिल राहून चालणार नाही. त्याचे कारण, राष्टÑवादीतील नाईक फॅमीली या निवडणुकीत आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे.ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला. मात्र २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या गडाचा बुरुज ढासळून त्याठिकाणी राष्टÑवादीच्या घडाळ्याने टिक टिक सुुरु केली होती. परंतु राष्टÑवादीची ही टिक टिक केवळ पाच वर्षे सुरु राहिली. २०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेत शिवसेनेने आपला गड पुन्हा ताब्यात घेतला. केवळ गड काबीज केला नाही तर २ लाख ८१ हजारांचे वाढीव मताधिक्क्य आपल्या झोळीत पाडून घेतले. त्यानंतर आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. या निवडणुकीत पुन्हा शिवसेनेच्या वतीने राजन विचारे मैदानात उतरले आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत राष्टÑवादीकडून उमेदवाराची चाचपणी सुरु होती. अखेर आनंद परांजपे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच राष्टÑवादीकडून प्रचाराला सुरुवात झाली होती.गणेश नाईक यांनी आम्ही दुसºयाला निवडून आणू शकतो असा पण केला असल्याने त्यांनी ही निवडणूक मनावर घेतली आहे. त्यांच्या घरातील सर्वच मंडळी आता प्रचारासाठी उतरली असून त्यांनी नवी मुंबईतून आणि मीरा भाईंदरमधून राष्टÑवादीचे वर्चस्व वाढवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. राष्टÑवादीकडून परांजपे हे जरी निवडणुकीच्या रिंगणात असले तरी प्रत्यक्षात एकप्रकारे गणेश नाईक हेच लढत आहेत. त्यामुळे परांजपे यांनी किती मते मिळतात, यावर नाईक यांचा ठाण्यातील राजकारणातील शिरकाव निश्चित होणार आहे.शिवसेनेने आधीच आत्मविश्वास बाळगला असून, मागील निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्क्यापेक्षा जास्तीच्या मताने निवडून येण्याचा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. शिवसेनेनी प्रचार रॅलीवर भर देण्यास सुरुवात केली आहे.सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत आणि सांयकाळी पुन्हा ५ ते रात्री १० असा प्रचार सुरु झाला आहे. केवळ प्रचार रॅलीच नव्हे, तर चौकसभा, पदाधिकाऱ्यांच्या रात्री १० नंतरच्या बैठका, मिटींग, मेळावे आदींच्या माध्यमातून या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांमध्ये मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी चढाओढ सुरु झाली आहे. ही लढाई आता केवळ रस्त्यावरची राहिली नसून सोशल मीडियामध्ये सुध्दा या दोघांमध्ये प्रचाराचा थरार रंगू लागला आहे. राष्टÑवादीच्या प्रचाराचे एक गाणे सध्या फेसबुकवर चांगलेच चर्चेत असून त्याला लाखाहून अधिक लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. तसेच रोजच्या रोज होणारे प्रचार रॅली, सभा आदींची माहिती मतदारापर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांच्या वॉररुम सज्ज झाल्या आहेत. सकाळ पासून रात्री उशिरापर्यंत या वॉररुमच्या माध्यमातून विविध संकल्पना सोशल मीडियावर अपलोड होतांना दिसत आहेत.शिवसेनेच्या उमेदवाराकडूनही फेसबुक आणि सोशल मीडियाच्या इतर माध्यमांवर भर दिला जाऊ लागला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या दोन उमदेवारांमध्ये वॉर रंगल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे सुरुवातीला काहीशी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आता ‘काटें की टक्कर’ ठरवी आहे. उच्च शिक्षित उमेदवाराचा मुद्दा सुध्दा सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.राष्टÑवादीकडून शहराच्या विविध भागात उमेदवाराचे बॅनर लागले असून याला सध्या तरी शिवसेनेकडून जबाब देण्यात आलेला नाही. भाजपने थेट मोदींचे बॅनर शहराच्या काही महत्वांच्या ठिकाणी लावल्याने मित्र पक्षासाठी भाजप कशापद्धतीने सक्रीय झाली हे दिसते. परंतु या बॅनवर कुठेही शिवसेनेचा काडीमात्र उल्लेख दिसत नाही. त्यामुळे भाजपने मोदींना मत द्या, असाच काहीसा नारा खुबीने दिला असल्याचे बोलले जात आहे. एकूणच या ना त्या कारणामुळे आता प्रचार अंतिम टप्प्यात येऊ पाहत आहे.मात्र आरोप प्रत्यारोपांमुळे ठाणे लोकसभा मतदारसंघ गाजेल हे आता लागलीच सांगणे कठीण राहिलेले नाही. लोकसभा निवडणुकीत प्रचाराची रंगत वाढू लागली आहे. प्रचारफेºया, चौकसभा याचबरोबर सोशल मीडियावरील प्रचार सुरु झाला आहे. अखेरच्या टप्प्यात निवडणुकीतील रंगत आणखी वाढत जाणार असून प्रचाराला धार चढण्याची शक्यता आहे.
सोशल मीडियावरही प्रचाराचा थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 1:29 AM