शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

शिवसेनेच्या गुंडशाहीविरोधात लढणाऱ्या भाजपच्या दोन कार्यकर्त्यांचा जाहीर सन्मान, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी पाऊल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 16:35 IST

Kalyan News: शिवसेनेच्या आमदारांनी व ज्येष्ठ नेते पदि असलेल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसमवेत एकत्र येऊन ज्या पद्धतीने मंगळवारी कल्याण पश्चिम येथील भाजप पक्ष कार्यालयावर हल्ला केला, त्याचा कल्याण भाजपच्या वतीने बुधवारी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात एकत्र येऊन त्याचा जाहीर निषेध करण्यात आला.

डोंबिवली -  शिवसेनेच्या आमदारांनी व ज्येष्ठ नेते पदि असलेल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसमवेत एकत्र येऊन ज्या पद्धतीने मंगळवारी कल्याण पश्चिम येथील भाजप पक्ष कार्यालयावर हल्ला केला, त्याचा कल्याण भाजपच्या वतीने बुधवारी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात एकत्र येऊन त्याचा जाहीर निषेध करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सांगितले. तसेच त्या झुंड, गुंडशाहीच्या विरोधात लढणाऱ्या भाजपच्या दोन निष्ठावान कार्यकर्त्यांचा सन्मानही आमदार गणपत गायकवाड यांच्याहस्ते बुधवारी करण्यात आला.

कार्यकर्ते प्रताप टूमकर व वैभव सावंत या दोन लढवय्या कार्यकर्त्यांनी पक्ष निष्ठा दाखवून भाजपचा कार्यकर्ता कसा असतो हे दाखवून दिले. पक्षाच्या कल्याण पश्चिमच्या पक्ष कार्यालयावर आमदार विश्वनाथ भोईर व शिवसेनेचे नेते बंड्या साळवी व त्यांचे सहकारी अशा पंचवीस लोकांनी एकत्र येऊन दगडफेक केली, काचा फोडल्या. त्यावेळी घटनास्थळी पक्षनिष्ठा जोपासून तिथे उपस्थित असणारे प्रताप व वैभव दोनच कार्यकर्ते निडरपणे थांबले, त्यांनी त्यांच्यापरीने प्रतिकार केला. पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित असताना आमदार भोईर यांनी त्यांच्या समर्थकांसमवेत यावं आणि दहशत करावी हे लोकशाहीला मारक आहे. सर्वसामान्य स्तरातून याचा खूप मोठ्या प्रमाणात निषेध होतोय असे प्रतीपादन कांबळे यांनी केले.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याना देशाचे स्वातंत्र्य वर्ष कितवे असावे हे माहीत नसणं खूप मोठं दुर्दैव आहे, अतिशय खेदजनक बाब आहे असे कांबळे म्हणाले. आणि त्यावर जाहीरपणे फक्त प्रतीप्रश्न विचारला म्हणून केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ राजकीय नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना सूडबुद्धीने अटक करणं हे कोणत्या लोकशाहीला धरून आहे आणि या घटनेवरून पूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरणे , तोडफोड करणे मारहाण करणे या गोष्टीचा आम्ही जाहीरपणे निषेध करीत असल्याचे त्यांनी समाजमाध्यमांद्वारे स्पष्ट केले. मंगळवारी त्या घडलेल्या घटनांचा स्थानिक कार्यकर्त्याना त्रास का? असा सवाल करत त्या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आणि पक्ष कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी कांबळे, आमदार गायकवाड, शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, डोंबिवली ग्रामीण अध्यक्ष नंदू परब, संजय मोरे, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा चौधरी, नाना सूर्यवंशी, स्वप्निल काटे, मिहिर देसाई अनेक कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र आले होते. 

टॅग्स :kalyanकल्याणPoliticsराजकारणBJPभाजपा