- अभय नरहर जोशी -
(स्थळ : बारामती मतदारसंघ गीत : पारंपरिक रचना... चाल : पारंपरिक) बारामतीच्या ताई दौंडच्या ताईंना उद्देशून...फू बाई फू... फुगडी फू...दमलीस काय माझ्या कांचन तू गं... कांचन तू...आत पोकळ, बाहेर पोकळ राजकारणाचा खेळदौंड म्हणे बारामतीला आता नाही आपला मेळबाई फुगडी फू...आत्या-भाची गोष्टी सांगे प्रीत त्यांची मोठीगेली सोडून भाची आमची ‘कमळी’च्या ओटीआता फुगडी फू...नवी नवी असलीस तरी नको आता लाजूचल मिळून दोघी, या निवडणुकीत झुंजूआता फुगडी फू...माझ्यासाठी ‘दादा’ गेला ‘इंदापूर’च्या घरीघेऊ बरोबर त्यांना, ‘दौंड’वर करू शिरजोरीआता फुगडी फू.................दौंडच्या ताई बारामतीच्या ताईंना उद्देशून...माफ करा आत्याबाई, काळ आला तसालढले तरी तुमचीच माना, टाकू नका फासाआता फुगडी फू...चुकला गडी, मागच्या वेळी झुंज दिली खाशीथोडक्यात गेला तोल अन् फुटली ‘कप-बशी’आता फुगडी फू...बारा‘मती’ गुंगवू आम्ही, ‘घड्याळ’ पाडू बंदभल्याभल्यांना भुलवतो बघा ‘कमळा’चा गंधआता फुगडी फू...भले भले शरण आम्हा, त्यांची दांडी करतो गुलतापू द्या राजकारण किती, आम्ही असतो ‘कुल’आता फुगडी फू...फू बाई फू, फुगडी फू...