Punjab Election 2022: १२ काँग्रेस आमदारांचा पत्ता कट?, काँग्रेसमध्ये खळबळ; सोनिया गांधींनी रचला प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 04:12 PM2022-01-16T16:12:26+5:302022-01-16T16:13:01+5:30
इतकचं नाही तर काँग्रेसच्या ८६ जणांच्या पहिल्या यादीनंतर १२ काँग्रेस आमदारांमध्ये खळबळ माजली आहे.
चंदिगड – काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश सोडून आता पंजाबवर लक्ष केंद्रीत केले आहे. सोनिया गांधींनी मुख्यमंत्री चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी न ऐकता ८६ जणांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेस सुप्रीमोने त्यांची कोअर टीम पंजाबच्या प्रत्येक क्षेत्रात काम करतेय त्यांच्या सर्व्हेनंतर या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्याचा निर्णय घेतला आहे.
निवडणुकीच्या निकालानंतर काहीही व्होवो, परंतु आतापर्यंत सोनिया गांधी(Sonia Gandhi) आणि त्यांच्या कोअर टीमच्या उमेदवारी निवडीवर चर्चा सुरु आहे. उमेदवारांची यादी पाहिली तर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बंडखोर नेते कॅप्टन अमरिंदर सिंग(Capt Amrinder Singh) यांचं निवडणुकीचं गणित बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसनं पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या निकटवर्तीयांना तिकीट देऊन मास्टरस्ट्रोक खेळला आहे. यादीत मागच्या निवडणुकीत पराभव झालेल्या नेत्यांचाही समावेश आहे.
आता अमरिंदर सिंग काय करणार? असा प्रश्न विचारला जात आहे. कारण अमरिंदर सिंग निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर अनेक दिग्गज त्यांच्यासोबत येतील असा दावा करत आहेत. परंतु अद्यापही असं काही झालं नाही. सर्वांची नजर काँग्रेसच्या तिकीट वाटपावर होती. त्यातही काँग्रेसनं कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासाठी जागा सोडली नाही.
सोनिया गांधींचा राजकीय प्लॅन
काँग्रेसनं कॅप्टनचे निकटवर्तीय असलेले आमदार गुरुप्रीत कांगड, साधु सिंग यांना तिकीट दिली आहे. कॅप्टन यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवल्यानंतर काँग्रेसनं त्यांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी केली होती. आमदार बलबीर सिद्धू आणि सुंदर शाम अरोडा यांच्यासोबतही ते कॅप्टनच्या जवळचे असल्याचं सांगितले गेले. परंतु या दोघांची काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी यांच्याशी जवळीक असल्याचं म्हटलं जातं. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे लुधियानाच्या दाखा येथून कॅप्टन संदीप संधू यांना तिकीट दिले आहे. जे कॅप्टनच्या सर्वात जवळच्या नेत्यांपैकी एक आहेत.
काँग्रेसमध्ये मंत्री राणा गुरजीत यांनाही कॅप्टनच्या जवळचं मानलं जायचं. त्यांना सुरुवातीला मंत्रिपद आणि आता तिकीट दिलं आहे. त्याचप्रकारे आक्रमक नेते सुखपाल खैहरा जेलमध्ये असतानाही त्यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे. ते ईडीच्या केसमध्ये पटियाला जेलमध्ये बंद आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वात त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता.
१२ काँग्रेस आमदारांमध्ये खळबळ
इतकचं नाही तर काँग्रेसच्या ८६ जणांच्या पहिल्या यादीनंतर १२ काँग्रेस आमदारांमध्ये खळबळ माजली आहे. काँग्रेसनं त्यांच्या ४ आमदारांचा पत्ता कट केला आहे. सध्या पक्षाने एकूण १२ आमदारांना वेटिंग लिस्टवर ठेवलं आहे. या आमदारांना तिकीट नाकारणार किंवा त्यांचा मतदारसंघ बदलणार अशा चर्चा सुरु आहेत.