शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

Pushkar Singh Dhami: उत्तराखंडमध्ये घमासान! अमित शहांनी समजावले तरी सतपाल महाराज दिल्लीत; 35 आमदार बंडखोरीच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2021 12:06 PM

Political crisis in Uttarakhand: पुष्‍कर सिंह धामी यांनी माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत आणि त्रिवेंद्र सिंह रावत यांची भेट घेतली आहे. धामी यांचे नाव जेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आले तेव्हापासून भाजपाचे वरिष्ठ मंत्री तरुण मुख्यमंत्र्याच्या मंत्रिमंडळात रहावे की नाही यावर विचार करत होते. यामुळे या नेत्यांनी मुख्यमंत्री कोण असावा हे ठरविण्यासाठी गुप्त बैठकही घेतल्याची चर्चा आहे. 

देहरादून : उत्तराखंडमध्ये नवा मुख्यमंत्री म्हणून पुष्‍कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर भाजपामध्ये मोठी नाराजी उफाळली आहे. धामी यांची निवड अनेक जुन्या नेत्यांना रुचलेली नसल्याने सतपाल महाराजांच्या (Satpal Maharaj) नेतृत्वाखाली ३५ आमदार राजीनामे देण्याच्या तयारीत दिल्लीत ठाण मांडून बसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. सतपाल महाराज दिल्लीला गेल्याचे सांगितले जात आहे. (Satpal Maharaj not happy over Pushkar Singh Dhami selected as CM in Uttarakhand)

दुसरीकडे पुष्‍कर सिंह धामी यांनी माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत आणि त्रिवेंद्र सिंह रावत यांची भेट घेतली आहे. धामी यांचे नाव जेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आले तेव्हापासून भाजपाचे वरिष्ठ मंत्री तरुण मुख्यमंत्र्याच्या मंत्रिमंडळात रहावे की नाही यावर विचार करत होते. यामुळे या नेत्यांनी मुख्यमंत्री कोण असावा हे ठरविण्यासाठी गुप्त बैठकही घेतल्याची चर्चा आहे. 

सुत्रांनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सतपाल महाराज आणि हरक सिंह रावत यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. गृहमंत्र्यांनी या दोन्ही नेत्यांना नव्या मुख्यमंत्र्यांशी जुळवून घेण्यास सांगितले आहे. भाजपातील काही आणखी वरिष्ठ नेते देखील धामी यांच्या नियुक्तीवर असंतुष्ट आहेत. त्यांच्या नेतृत्वात मंत्री होण्यासदेखील कचरत आहेत. सतपाल महाराज अमित शहांना भेटले असले तरीदेखील दिल्लीतच थांबलेले आहेत. अन्य मंत्रीदेखील नाराज आहेत. आज सायंकाळी धामी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यामुळे त्यांच्यासोबत कोण कोण शपथ घेतात आणि त्या कार्यक्रमाला जातात याकडे साऱ्यांची लक्ष लागले आहे. 

तीरथ सिंह रावतांच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिलेले बंशीधर भगत यांना ३५ आमदारांबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, मी कुठेतरी वाचलेय की ३५ आमदार दिल्लीला गेले आहेत. हे कोण आहेत त्यांची नावे सांगा, या केवळ अफवा आहेत. आज केवळ मुख्यमंत्रीच शपथ घेणार आहेत.  

टॅग्स :BJPभाजपाAmit Shahअमित शहा