शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

राज्यात खटके उडू लागताच, मुंबई महापालिकेत सेना-काँग्रेसमध्ये जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2021 7:00 AM

विरोधी पक्षनेते विरुध्द स्थायी समिती अध्यक्ष सामना रंगला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पूर्वसूचना न देता महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला गैरहजर राहिल्याप्रकरणी काँग्रेसच्या नगरसेविका कमरजहॉ सिद्दिकी यांना चिटणीस विभागाने नोटीस पाठवली आहे. मात्र काँग्रेसने यासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांना जबाबदार धरले आहे. तर काँग्रेसला भाजपच्या दावणीला बांधले जात असल्याचे प्रत्‍युत्तर अध्यक्षांनी दिले आहे, त्यामुळे काँग्रेस व शिवसेनेमध्ये नवीन वादाला तोंड फुटले आहे.

नियमानुसार पूर्वकल्पना न देता सलग तीन महिने सभागृहात अनुपस्थित राहणाऱ्या नगरसेवकाचे पद रद्द ठरते. त्यानुसार २७ ऑक्टोबरपासून महासभेला गैरहजर राहिलेल्या सिध्दीकी यांना चिटणीस विभागाने नोटीस पाठवून ५ जानेवारी रोजी होणाऱ्या महासभेत उपस्थित न राहिल्यास आपले नगरसेवकपद रद्द होऊ शकते, अशी सूूूचना दिली. परंतु, वैयक्तिक कारणाने गैरहजर राहत असल्याचे चिटणीस विभागाला दिलेले पत्र त्यांनी सभागृहाच्या पटलावर मांडले नाही. सिध्दीकी या मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या भगिनी आहेत. हे काँग्रेस विरोधात षडयंत्र असून स्थायी समिती अध्यक्षांच्या दबावाखाली काम सुरू आहे, असा आरोप रवी राजा यांनी केला.तसेच चिटणीस यांना तात्काळ पदावरून दूर करण्याबाबत आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना काँग्रेसने पत्रही दिले. मात्र अशा प्रकारचे स्मरणपत्र काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी दोन आणि भाजपच्या तीन नगरसेवकांना पाठविण्यात आले आहे. तरीही या प्रकरणात संबंधितांकडून खुलासा मागविण्यात आला आहे, असे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले. सिध्दीकी यांनी १५ दिवसांच्या रजेसाठी पत्र दिले होते. महासभेच्या पटलावर एक महिन्यांच्या रजेचे पत्र पाठवले जाते असल्याने त्यांचे पत्र पटलावर मांडण्यात आले नाही, असे त्यांनी सांगितले.

मुंबईच्या हितासाठी आपण बोलतच राहणार. मनमानी कारभार चालू देणार नाही. काँग्रेसच्या सदस्यांना नाहक त्रास दिला जात आहे. असा प्रकार खपवून घेणार नाही.- रवी राजा, विरोधी पक्षनेते, मुंबई पालिका

गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते शिवसेनेवर नाहक आरोप करीत आहेत. ते, काँग्रेसला भाजपच्या दावणीला बांधत आहेत, असेच दिसते. राजकीयदृष्टीने वैयक्तिक हितासाठी ते आरोप करीत आहेत.- यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका