राफेल प्रकरणी पंतप्रधान मोदी तुरुंगात जातील की नाही हा देशापुढे प्रश्न :पृथ्वीराज चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 09:18 PM2019-01-04T21:18:25+5:302019-01-04T21:19:18+5:30
देशापुढे बोफोर्स घोटाळा झाला की नाही हा नव्हे तर नरेंद्र मोदी तुरुंगात जातील की नाही हा प्रश्न आहे असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात व्यक्त केले.
पुणे : देशापुढे बोफोर्स घोटाळा झाला की नाही हा नव्हे तर नरेंद्र मोदी तुरुंगात जातील की नाही हा प्रश्न आहे असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात व्यक्त केले.पुण्यात एका कार्यक्रमाला आले असता त्यांनी पत्रकारांशी बातचीत केली.यावेळी त्यांनी राफेल घोटाळा, भारीपसोबतची आघाडी आणि राष्ट्रवादीसोबतच्या जागा वाटपाबद्दल मते व्यक्त केली.
पुढे ते म्हणाले की,राफेल हा असा व्यवहार आहे कीजो सरकार दाबून टाकून राष्ट्रीय सुरक्षेच्या खुली चर्चा होऊ देत नव्हता. त्याची आता खुलेपणाने चर्चा सुरू झाली आहे.याबद्दल संसदेत चर्चा झाल्यावर कोणाच्याही मनात काहीतरी घोटाळा झाल्याबद्दल शंका नाही. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात खोटं प्रतिज्ञापत्र दिले.यासाठी सुप्रीम कोर्टासारख्या संस्थेचा वापर केला गेला हे गंभीर आहे.दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी तोंड उघडायला तयार नसल्याने सरकारला काहीतरी लपवायचं आहे हे लोकांच्या लक्षात आलं आहे.
राज्यातील भाजपच्या सद्यःस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले की,भाजप अध्यक्ष अमित शहा यांना सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यांना मागील निवडणुकीपेक्षा 100 जागा कमी मिळतील असा अंदाजही त्यांनी वर्तवला.आघाडीसाठी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जागा वाटपाविषयी चर्चा सुरू आहे.असा कोणताही 24-24चा फॉर्म्युला अद्याप अंतिम झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.भारीपच्या प्रकाश आंबेडकर यांना आम्ही आमंत्रण दिले आहे.आता यायचे की नाही हा निर्णय त्यांनी घ्यावा.राहुल गांधी हे विदर्भातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला त्यांनी नकार दर्शवला.असे काहीही नसून ते बहुदा अमेठीतून लढवतील असेही ते म्हणाले.