स्वत:च्या पक्षाचा प्रचार न करणारे राधाकृष्ण विखे हे पहिले विरोधी पक्षनेते!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 05:34 AM2019-04-25T05:34:27+5:302019-04-25T07:18:35+5:30

लोकसभा निवडणुकीत स्वपक्षाचा प्रचार न करणारे काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे हे देशातील एकमेव विरोधी पक्षनेते ठरले आहेत.

Radhakrishna Vikhee, who did not propagate her own party, is the first leader of the Opposition! | स्वत:च्या पक्षाचा प्रचार न करणारे राधाकृष्ण विखे हे पहिले विरोधी पक्षनेते!

स्वत:च्या पक्षाचा प्रचार न करणारे राधाकृष्ण विखे हे पहिले विरोधी पक्षनेते!

Next

- अतुल कुलकर्णी 

मुंबई : लोकसभा निवडणुकीत स्वपक्षाचा प्रचार न करणारे काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे हे देशातील एकमेव विरोधी पक्षनेते ठरले आहेत.
पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल सत्तार यांना तडकाफडकी पक्षातून निलंबित करण्यात आले. मात्र विखेंच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही. योग्यवेळी त्यावर निर्णय घेतला जाईल असे म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यावर काहीही बोलायला तयार नाहीत.

भाजप सोबत विखे यांच्या जवळीकीची सतत चर्चा होत होती. अगदी सुरुवातीच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावर निघाले तेव्हा त्यांच्यासोबत विरोधी पक्ष नेते म्हणून विखे ही निघाले होते. राज्याच्या इतिहासात एकही विरोधी पक्ष नेता मुख्यमंत्र्यांच्या सरकारी दौºयात गेलेला नाही. माध्यमांनी टीका केल्यानंतर विखे यांनी तो दौरा रद्द केला होता. मात्र विधानसभेतही त्यांच्या कार्यपध्दतीवर त्यांच्याच पक्षाचे नेते कायम नाराजी व्यक्त करत आले. त्यानंतर त्यांचा मुलगा भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांनी राष्टÑवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीका करत आपण अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेसचा प्रचार करणार नाही असे जाहीर केले होते. मात्र त्यांनी नगरमध्येच नाही तर राज्यात कोठेही काँग्रेसच्या प्रचारासाठी एकही सभा घेतलेली नाही. काँग्रेसच्या स्टार प्रचारकाच्या यादीत त्यांचे नाव असूनही त्यांना पक्षाच्या एकाही उमेदवाराने आपल्या मतदारसंघात प्रचाराला या, असे निमंत्रण दिले नाही आणि त्यांनीही कोठे जाऊन प्रचार केला नाही.
विखे यांच्यावर कधी कारवाई करणार असे विचारले असता प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी त्यावर काहीही बोलण्यास नकार दिला. सुजय विखे निवडून आले तर राधाकृष्ण विखे स्वत:च भाजपमध्ये जातील, अशी चर्चा आहे.

Web Title: Radhakrishna Vikhee, who did not propagate her own party, is the first leader of the Opposition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.