राहुल गांधी म्हणाले, आता एक बाजू निवडण्याची वेळ, माझा निर्णय स्पष्ट, मी.…

By बाळकृष्ण परब | Published: January 28, 2021 10:44 PM2021-01-28T22:44:00+5:302021-01-28T22:46:36+5:30

Farmer Protest News : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाबाबत मोठे विधान केले आहे.

Rahul Gandhi said, now is the time to choose one side, my decision is clear, I. | राहुल गांधी म्हणाले, आता एक बाजू निवडण्याची वेळ, माझा निर्णय स्पष्ट, मी.…

राहुल गांधी म्हणाले, आता एक बाजू निवडण्याची वेळ, माझा निर्णय स्पष्ट, मी.…

Next

नवी दिल्ली - दिल्लीच्या सीमेवरील गाझीपूर सीमेसह इतर सीमांवर आंदोलन करत असलेल्या शेतकरी आंदोलकांना रस्त्यावरून हटवण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाबाबत मोठे विधान केले आहे. आता एक बाजू निवडण्याची वेळ आली आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, आता एक बाजू निवडण्याची वेळ आली आहे. माझा निर्यण स्पष्ट आहे. मी लोकशाहीसोबत आहे. मी शेतकरी आंणि त्यांच्या शांततामय मार्गाने चाललेल्या आंदोलनासोबत आहे.

दरम्यान, राहुल गांधींच्या आधी त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी यांनीही शेतकरी आंदोलनाबाबत मोठे विधान केले होते. प्रियंका गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या होत्या की, काल रात्री शेतकरी आंदोलन लाठीच्या बळावर संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करण्यात आळा. आज गाझीपूर आणि सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांना धमकावण्यात येत आहे. हे लोकशाहीच्या प्रत्येक नियमाच्या विरोधातील आहे. काँग्रेस शेतकऱ्यांसोबतच्या या संघर्षामध्ये उभी राहील. शेतकरी हे देशाचे हित आहे. जे शेतकऱ्यांना तोडण्याचा प्रयत्न करणारे देशद्रोही आहेत.

प्रियंका गांधी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, आंदोलनातील हिंसक तत्त्वांवर कारवाई करण्यात यावी. मात्र जे शेतकरी शांततेने आंदोलन, संघर्ष करत आहेत. त्यांच्यासोबत देशाची जनता ही संपूर्ण शक्तीने उभी राहील.

Web Title: Rahul Gandhi said, now is the time to choose one side, my decision is clear, I.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.