नरेंद्र मोदींना 'मन की बात' कार्यक्रमापूर्वी राहुल गांधींचे आव्हान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 10:26 AM2021-02-28T10:26:16+5:302021-02-28T10:30:04+5:30

Rahul Gandhi : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

Rahul Gandhi's challenge to Narendra Modi before 'Mann Ki Baat' program, said ... | नरेंद्र मोदींना 'मन की बात' कार्यक्रमापूर्वी राहुल गांधींचे आव्हान, म्हणाले...

नरेंद्र मोदींना 'मन की बात' कार्यक्रमापूर्वी राहुल गांधींचे आव्हान, म्हणाले...

Next
ठळक मुद्दे 'मन की बात' कार्यक्रमातून नरेंद्र मोदींनी रोजगार आणि शेतकऱ्यांबाबत भाष्य करावे, असे आव्हान राहुल गांधी यांनी केले आहे.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज 28 फेब्रुवारी रोजी देखील ते 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. 'मन की बात' कार्यक्रमातून नरेंद्र मोदींनी रोजगार आणि शेतकऱ्यांबाबत भाष्य करावे, असे आव्हान राहुल गांधी यांनी केले आहे. (rahul gandhi challenged pm modi to talk on jobs and farmers before mann ki baat)

राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. " हिम्मत है तो करो - #KisanKiBaat #JobKiBaat", असे ट्विट करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना आव्हान दिले आहे. दरम्यान, राहुल गांधी सतत विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारला घेण्याचा प्रयत्न करत आहे. शनिवारी महागाईच्या मुद्द्यावरून काढण्यात आलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारवर राहुल गांधींनी हल्लाबोल केला होता. 'अशी एखादी जागा आहे, जिथे आपल्याला दैनंदिन वस्तू मिळतात आणि तेथे जाऊन आपल्याला असे वाटू नये की सरकार आपल्याला लुटत आहे?' असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. 

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. यादरम्यान देशात पुन्हा वाढत असलेला कोरोना, कोरोना लसीकरण आणि नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन याबाबत नरेंद्र मोदी आज बोलण्याची शक्यता आहे. याआधीच्या 'मन की बात' कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनावेळी शेतकऱ्यांच्या रॅलीदरम्यान झालेले हिंसक आंदोलन आणि आंदोलनात जमावाकडून ज्या पद्धतीने तिरंग्याचा अपमान झाला, त्याचे दु:ख व्यक्त केले होते.

नरेंद्र मोदी म्हणाले होते की, "या सर्व घडामोडींमध्ये दिल्लीत 26 जानेवारी रोजी तिरंग्याचा अपमान पाहून देश अत्यंत दुखी झाला." याचबरोबर, देशातील कोरोना संकटावर भाष्य करताना नरेंद्र मोदी म्हणाले होते की, "कोरोना विरोधात भारताची लढाई जगासमोर एक उदाहरण बनली आहे. अशा परिस्थितीत आपली लसीकरण मोहीमही जगभरात एक उदाहरण आहे. संकटकाळात भारत स्वतः आत्मनिर्भर असल्यामुळे इतर देशांचीही मदत करु शकला," असेही नरेंद्र मोदी म्हणाले होते.

Web Title: Rahul Gandhi's challenge to Narendra Modi before 'Mann Ki Baat' program, said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.