नवी दिल्ली: काँग्रेसच्या १३६ व्या स्थापना दिनानिमित्त आज पक्षाकडून देशात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी परदेशात गेले आहेत. त्यावरून भारतीय जनता पक्षाकडून राहुल गांधींना लक्ष्य करण्यात येत आहे. भाजपकडून होत असलेल्या टीकेला काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.राहुल गांधींची आजी आजारी आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं राहुल गांधी देशाबाहेर गेले आहेत. आपल्या घरातील एखादी व्यक्ती, नातेवाईक आजारी असल्यास आपण सर्व काही सोडून त्यांच्यासाठी धावून जातो, असं राजीव सातव यांनी सांगितलं. 'दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना राहुल गांधी परदेशात गेल्याचं भाजप नेते म्हणतात. पण पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांसोबत चर्चा करत नाहीत. देशाच्या अर्थव्यवस्थेची पूर्णपणे वाताहत झाली आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. पण तरीही मोदी याबद्दल चकार शब्द काढत नाहीत,' अशा शब्दांत सातव यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.
राहुल गांधी अचानक परदेशी का गेले?; खासदार सातव यांनी सांगितलं कारण
By कुणाल गवाणकर | Published: December 28, 2020 12:47 PM