नवी दिल्ली : काँग्रेसमधी पक्षांतर्गत वादाचे पडसाद सोशल मीडियावरही उमटले. ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्न लावल्यानंतर सोमवारी सकाळी ९ वाजेपासून टष्ट्वीटरवर राहुल गांधीच ट्रेंड करीत होते. राहुल यांनीच पक्षाचे नेतृत्व करावे, तेच काँग्रेसला तारू शकतील, हा ट्रेंड काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीच्या तासभर आधी बदलून माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांच्याभोवती केंद्रित झाला. राहुल यांच्या समर्थनार्थ टष्ट्वीट करणाऱ्यांना प्रत्यूत्तरासाठी कपिल सिब्बल खरे बोलले हा ट्रेंड सुरू झाला.
नेत्यांनी लिहिलेल्या पत्राच्या टाईमिंगवर संशय व्यक्त करून राहुल गांधी यांनी या गोंधळात भाजपला जबाबदार ठरवले. भडकलेल्या सिब्बल यांनी मग गेल्या ३० वर्षात कांग्रेससाठी केलेल्या कामाची यादीच सोशल मीडियावर प्रसिद्ध केली व तेथून सोशल मीडियावर जणू युद्धच पेटले. काँग्रेसमधील राहुल गांधी समर्थक विरूद्ध इतर असे गट ट्विटवरसरही दिसत होते. दिवसभर कपिल सिब्बल, राहुल गांधी, काँग्रेस, सीडब्ल्यूसीचा ट्रेंड सुरू होता. ज्येष्ठ लेखिका शोभा डे यांनी राहुल यांच्याविषयी अत्यंत खोचक प्रतिक्रिया दिली. राहुल बाबा मोठे व्हा,हा पक्ष आहे तुमची ड्रॉर्इंग रूम नाही. अपरिपक्वपणासही मर्यादा असते- या शोभा डे यांच्या विधानाला राहुल विरोधकांचे समर्थन मिळाले. तात्काळ राहुल समर्थकांनी शोभा डे यांच्यावरही टीका करण्यास प्रारंभ केला. दुपारी कपिल सिब्बल यांनी वादग्रस्त ट्विट मागे घेतल्याचे जाहीर केल्यानंतर राहुल समर्थकांनी त्यांच्याविरोधातील ट्विटरबाजी थांबवली. ज्येष्ठ नेते बाजूला झाल्याशिवाय तरुणांना संधी मिळणार नाही, अशा आशयाचे ट्विटदेखील व्हायरल झाले होते. सकाळी नऊ ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत राहुल गांधीच ट्विटरवर ट्रेंड होत होते. राहुल यांच्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी टीप्पणी केल्यास तसाही ट्रेंड या आधी झाला. राहुल गांधी यांच्याभोवती सोशल मीडिया ट्रेंड पहिल्यांदाच केंद्रीत झाला.80 हजारांपेक्षा जास्त ट्रेंड केवळ तासाभरातच राहुल गांधी यांच्यासाठीच होता. एरवी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात सत्ताधारी भाजप आघाडीव असतो, मात्र काँग्रेसमधील ऐतिहासिक वादाच्या दिवशी काँग्रेसने भाजपला मागे टाकले.