''राहुल गांधी यांनी केलेली भाषणेही मनापासून ऐकते''

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 04:46 AM2019-04-19T04:46:04+5:302019-04-19T04:46:21+5:30

उत्तर भारतातील नेते दक्षिणेकडील राज्यांत इंग्रजी वा हिंदीत जी भाषणे करतात ती स्थानिकांना समजत नाहीत

"Rahul Gandhi's speeches also listen intently." | ''राहुल गांधी यांनी केलेली भाषणेही मनापासून ऐकते''

''राहुल गांधी यांनी केलेली भाषणेही मनापासून ऐकते''

Next

पतनापूरम : उत्तर भारतातील नेते दक्षिणेकडील राज्यांत इंग्रजी वा हिंदीत जी भाषणे करतात ती स्थानिकांना समजत नाहीत व त्यामुळे हिंदी भाषणे सुरू होताच, लोक निघून जातात. पण केरळच्या पतनापुरमच्या सभेत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या इंग्रजी भाषणाचा मल्याळम भाषेत उत्तम अनुवाद करणाऱ्या व जनसमुदायाला खिळवून ठेवणाºया ज्योती विजयकुमार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. संगीताप्रमाणेच मी राहुल गांधी यांची भाषणे मनापासून ऐकते, असे ज्योतीने म्हटले आहे.
डी. विजयकुमार या काँग्रेस नेत्याची मुलगी ज्योती (३९ वर्षे) या तिरुवनंतपुरम येथील सिव्हिल सर्व्हिस अ‍ॅकॅडमीमध्ये समाजशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका आहेत. त्यांनी कायद्याचे शिक्षणही घेतले आहे. पतनापूरमच्या मंगळवारच्या सभेत राहुल गांधी यांनी केलेल्या इंग्रजी भाषणाचा ज्योती विजयकुमार यांनी मल्याळम भाषेत इतका प्रवाही व प्रभावी अनुवाद केला की, सभेला आलेल्या श्रोत्यांनी टाळ्या वाजवून त्याला दाद दिली. (वृत्तसंस्था)
>यांची तारांबळ
राहुल गांधी यांच्या एका इंग्रजी भाषणाचा मल्याळममध्ये अनुवाद करण्याची जबाबदारी ज्येष्ठ काँग्रेस नेते पी.जे. कुरियन यांच्याकडे होती. पण ध्वनिक्षेपकांतून येणारा प्रतिध्वनी व अन्य अडचणींमुळे राहुल नेमके काय बोलत आहेत हे कुरियन यांनाच समजत नव्हते. त्यामुळे राहुल यांच्या भाषणाचा अनुवाद करताना त्यांचा गोंधळ उडाला. यामुळे निराश झालेल्या राहुल गांधी यांनी भाषण आटोपते घेतले व आता मीच मल्याळम भाषा शिकणार आहे, असे उद्गार सभेत काढले. हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला होता.

Web Title: "Rahul Gandhi's speeches also listen intently."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.