शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

भाजपाचा मोठा निर्णय, 'या' राज्यात एकाही विद्यमान खासदाराला मिळणार नाही पुन्हा तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 9:26 AM

भाजपानं छत्तीसगडमध्ये विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट न देण्याचं जवळपास निश्चित केलं आहे.

रायपूर- भाजपानंछत्तीसगडमध्ये विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट न देण्याचं जवळपास निश्चित केलं आहे. छत्तीसगडभाजपाचे प्रभारी आणि राष्ट्रीय महासचिव अनिल जैन म्हणाले, भाजपा लोकसभा निवडणूक 2019मध्ये विद्यमान 10 खासदारांना तिकीट नाकारून त्याऐवजी इतरांना संधी देणार आहे.एएनआयच्या वृत्तानुसार, भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समिती(सीईसी)नंही विद्यमान खासदारांना बदलण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. गेल्या वर्षी झालेल्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तसेच भाजपाला छत्तीसगडमधील सत्ताही गमवावी लागली होती. त्यामुळेच भाजपानं विद्यमान खासदारांना बदलण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशमध्येही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपाच्या मुरली मनोहर जोशी यांचाही कानपूरमधून पत्ता कट केला जाऊ शकतो. त्याऐवजी उत्तर प्रदेश कॅबिनेटमध्ये मंत्री असलेल्या सतीश महाना यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. तसेच राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांचा मुलगा राजवीर सिंह याला एटातून उमेदवारी मिळू शकते. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वाराणसीतूनच निवडणूक लढणार आहेत. भाजपानं उत्तर प्रदेशमधल्या 24 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.या यादीमध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचं नाव असून, ते लखनऊमधून निवडणूक लढणार आहेत. तर स्मृती इरानी या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात अमेठीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. केंद्रीय मंत्री महेश शर्मा (गौतमबुद्ध नगर), हेमा मालिनी (मथुरा), रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा (गाझीपूर) आणि वीरेंद्र सिंह (भदोही) निवडणूक लढवणार आहेत. रमाशंकर कठेरिया(आग्रा), राघव लखनपाल(सहारनपूर), सत्यपाल सिंह(बागपत) आणि कीर्ति वर्धन सिंग(गोंडा) यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. कंवर सिंह तंवर(अमरोहा), महेंद्र नाथ पांडे(चंदोली), संतोष गंगवार(बरेली), विनोद सोनकर(कौशाम्बी) आणि कृष्ण राज (शाहजहांपूर) या निवडणुकीत नशीब आजमावणार आहेत.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकChhattisgarhछत्तीसगडBJPभाजपाSmriti Iraniस्मृती इराणीNarendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेश