मुंबई – कोरोनाच्या परिस्थितीत राज्य केंद्राकडे बोट दाखवतंय, केंद्र राज्यांकडे बोट दाखवतंय, पण लोकांना ह्याविषयी घेणं देणं नाही. लोकांची एकच अपेक्षा आहे की आम्हाला यातून सोडवा. कोरोनाचं संकट अभूतपूर्व आहे पण त्या काळात सरकारवर टीका करण्याची वेळ नव्हती. दोन्ही सरकारच्या चुका झाल्या पण ही वेळ राजकारण करण्याची नव्हती म्हणून विरोधी पक्षांनी जबाबदारीने वागायला हवं होतं. भविष्यात ह्यावर बोलूच असं राज ठाकरेंनी सांगितले.
तसेच कोरोनाच्या काळात मी घराबाहेर जाणं टाळलं कारण मी बाहेर गेलो असतो तर माझ्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली असती त्यातून संसर्गाची भीती होती पण जे सरकारमधल्या लोकांनी मात्र घराबाहेर पडणं आवश्यक होतं. उद्धव ठाकरे टीव्हीवर दिसत होते, त्या सरकारचा कारभार दिसत नाहीये, दिसला नाही. कोरोनाच्या काळात खासगी रुग्णालयांनी रुग्णांची वारेमाप लूट केली पण त्यांच्यावर सरकार चाप लावू शकला नाही. खासगी रुग्णालयांना सरकारकडून सवलती मिळतात तरी रुग्णांना ती नाकारू कशी शकतात? असा सवाल राज यांनी उपस्थित केला.
हे सरकार जास्त दिवस टिकेल वाटत नाही
राज्यातील तीन पक्षांचं सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही कारण ह्या तिन्ही पक्षांमध्ये कोणताही संवाद दिसत नाहीये ताळमेळ जाणवत नाहीये. हे सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही, हे आधीपासून बोलतोय, माझी इच्छा नाही हे सरकार पडावं पण तीन पक्षाचं सरकार आहे, एकमेकांना विचारलं जात नाही, त्यामुळे हे टिकेल वाटत नाही, सरकारमधील पक्षांमध्ये विसंवाद आहे हे प्रखरतेने दिसून येते असं राज ठाकरे म्हणाले.
राम मंदिराच्या ई-भूमीपूजनावरुन उद्धव ठाकरेंना टोला; राज ठाकरेंनी मांडली परखड भूमिका
राम मंदिराचं ई-भूमीपूजन कशाला हवं?
लोकांच्या मनातील कोरोनाची भीती दूर झाल्यावर सगळं स्थिरस्थावर झाल्यावर राममंदिराचं धुमधाकडक्यात भूमीपूजन व्हायला हवं. हा लोकांच्या आनंदाचा भाग आहे त्यामुळे त्याचं ई-भूमीपूजन नको त्याचं जल्लोषात भूमीपूजन हवं असं सांगत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या विधानावर टोला लगावला आहे.
...म्हणून मी घराबाहेर जाणं टाळतो; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला खुलासा
सोनू सूदमागे आर्थिक शक्ती कोणाची?
सोनू सूद चांगलं काम करतोय त्याबाबत दुमत नाही परंतु इच्छा सगळ्यांची असते तरीही आर्थिक परिस्थितीमुळे ते करता येत नाही. सोनूला आर्थिक पाठबळ कुणाचं हे पुढे जाऊन कळेल. सोनू सूदला आर्थिक पाठिंबा कुठून आला हे तपासणं गरजेचे आहे, सोनू सूद करतोय हे चांगले आहे पण एकटा सोनू सूद हे करणे शक्य नाही. यामागे निश्चित मोठी आर्थिक शक्ती आहे असं राज ठाकरे म्हणाले.