शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

'मोदी 'शाही'ला गाडू या, चला शिवतीर्थावर जमू या'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2019 4:31 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेणार आहे.

मुंबईः मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेणार आहेत. या सभेतून ते मोदी आणि भाजपाविरोधात रणशिंग फुंकणार आहेत. या निमित्तानं मनसेनंही कॅम्पेनिंग सुरू केलंय. या कॅम्पेनिंगच्या व्हिडीओतून मोदींवर शरसंधाण साधण्यात आलं. तुम्ही त्यांना प्रश्न विचारले की ते तुमच्यावर देशद्रोहाचा शिक्का मारतील. तरीही आपण त्यांना सामान्य माणसाला होरपळवणाऱ्या नोटाबंदीचा जाब विचारू या, मोदी'शाही'ला गाडू या, चला शिवतीर्थावर जमू या, असा संदेश या व्हिडीओतून देण्यात आला आहे. त्यामुळे राज ठाकरे मोदींविरोधात आक्रमक प्रचार करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.मनसेच्या मेळाव्यात 'राज'गर्जना होणार असल्याची दणदणीत जाहिरात पक्षाने केलीय. स्टेजवर राज यांच्यासाठी जे पोडियम आहे, त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला दोन मोठे पडदे असतील.हे पडदे खास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणांसाठी लावण्यात आल्याची चर्चा आहे. गेल्या दोन भाषणांमध्ये राज ठाकरेंनी मोदींच्या जुन्या भाषणांच्या क्लिप दाखवल्या होत्या. तशीच मोदींची आणखी काही भाषणं उद्या ऐकायला मिळू शकतात.मनसे लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र त्याचवेळी, मोदींच्या विरोधात काम करण्याचे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिलेत. यापुढे ज्या सभा घेईन, त्या मोदी-शहांच्या विरोधात असतील, असंही त्यांनी जाहीर केलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही प्रमुख उमेदवारांसाठी राज त्यांच्या-त्यांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेणार असल्याचंही निश्चित झालंय. त्यामुळे मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच राज ठाकरेंच्या निशाण्यावर असतील, हे पक्कं आहे.आता तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील दोन्ही प्रचारसभांमध्ये थेट शरद पवार यांच्यावर वार केलेत. पुतण्यानेच पवारांची 'दांडी गुल' केली, देशातील हवा पाहूनच पवारांनी निवडणुकीतून माघार घेतली, अशी टोलंदाजी मोदींनी केली होती. त्यामुळे आता राज ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी कशी बॅटिंग करतात, मोदींची कुठली भाषणं ऐकवतात, मनसैनिकांना काय रणनीती सांगतात, हे पाहणं औत्सुक्याचं आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019MNSमनसे