शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामुळे हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटीच मिळेल - प्रवीण दरेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 10:03 PM

Pravin Darekar : राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून भाजपाने प्रवीण दरेकर यांनी मोठं विधान केले आहे.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्या दौरा करणार असल्याचे समजते. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून भाजपाने प्रवीण दरेकर यांनी मोठं विधान केले आहे. राज ठाकरेंच्या या दौऱ्यामुळे हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटीच मिळेल, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

येत्या १ ते ९ मार्च दरम्यान राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे नियोजन सुरु आहे. याबाबतची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. याविषयी TV9 या वृत्तवाहिनीशी बोलताना भाजपाचे नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, शिवसेनेत असतानाही राज ठाकरेंची हिंदुत्वाची भूमिका राहिलेली आहे. अयोध्येत जाऊन राज ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटीच मिळेल. 

याचबरोबर, मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपा आणि मनसे युती करणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. यावरही प्रवीण दरेकर यांनी भाष्य केले. यावेळी "युती ही समविचारी घटकांची होत असतो. वैचारिक विचारधारावर होत असते किंवा तशाप्रकारचे वातावरण असते. हिंदुत्वाची भूमिका त्यांनी घेतली किंवा तशाप्रकारचे काही वातावरण आले तर हिंदुत्ववादी विचारांचे पक्ष व संघटना एकत्र येण्यास निश्चितपणे चांगले वातावरण निर्माण होईल, असे मला वाटत असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले.

दरम्यान, राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकाचवेळी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्याने आता राज्यात पुन्हा एकदा मनसे आणि भाजपाच्या युतीची चर्चा सुरु झाली आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी मनसे भाजपासोबत जाणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली होती.

(नुसतं अयोध्येत जाऊन चालत नाही, हिंदू धर्मात चारधाम आहेत - नवाब मलिक)

राज्यात भाजपा- मनसे युती? राज्यात भाजपाशी फारकत घेतल्यानंतर शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत सहभागी झाली आहे. त्यामुळे शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याची टीकाही वेळोवेळी होत आहे. याच गोष्टीचा फायदा उचलत मनसेने हिंदुत्वाकडे वाटेने मार्गक्रमण सुरु केले आहे. त्याचवेळी भाजपा आणि मनसेची एकत्र येण्याच्या चर्चांना देखील मोठे उधाण आहे .  

टॅग्स :pravin darekarप्रवीण दरेकरRaj Thackerayराज ठाकरेAyodhyaअयोध्या